मोदी आणि जपानच्या पंतप्रधानांचा आज रोड शो, शिंजो आबेंचा भारत दौरा

मोदी आणि आबे यांच्या हस्ते उद्या गुरुवारी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं भूमीपूजन करण्यात येणार आहे.

By: | Last Updated: > Wednesday, 13 September 2017 11:21 AM
Here’s Japanese PM Shinzo Abe’s schedule during his two-day India visit

नवी दिल्ली: जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आजपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. दोन्ही दिवस ते गुजरातमध्येच राहणार आहेत.  मोदी आणि आबे यांच्या हस्ते उद्या गुरुवारी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं भूमीपूजन करण्यात येणार आहे.

भारत-चीन डोकलाम वादाच्या पार्श्वभूमीवर आबे यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. गेल्या 3 वर्षांत मोदी आणि आबे यांनी 10 वेळा एकमेकांची भेट घेतली आहे.

अहमदाबादला नवरीसारखं नटवलं

शिंजो आबे यांच्या स्वागतासाठी अहमदाबाद शहराला नवरीसारखं नटवण्यात आलं आहे. रात्री साबरमती नदीकिनारा तिरंग्याच्या झगमगाटात पाहायला मिळाला.

नदी किनारी भारत-जपान मैत्री दाखवण्यासाठी दोन्ही देशांचे झेंडे मोठ्या एलईडी स्क्रीनवर दाखवण्यात आले. केवळ साबरमती नदीच नव्हे तर संपूर्ण अहमदाबाद शहर रंग-बिरंगी प्रकाशाने लखलखून गेलं आहे.

sabarmati river

अहमदाबादेत रोड शो

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे दुपारी साडेतीनच्या सुमारास अहमदाबादेतील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर दाखल होतील. इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचं स्वागत करतील.

इथूनच मोदी आणि आबे यांच्या ऐतिहासिक रोड शोला सुरुवात होईल. दोन देशांचे पंतप्रधान रोड शो करण्याची ही जगातील कदाचित पहिली घटना असेल. 8 किमी रोड शोदरम्यान भारतीय संस्कृतीची विविधता दाखवण्यात येईल.

28 राज्यांच्या कलाकारांचा समावेश

मोदी आणि आबे यांच्या रोडशोदरम्यान 28 छोटे छोटे स्टेज उभारण्यात आले आहेत. इथे 28 राज्यांचे कलाकार पारंपारिक वेशभूषेत आपल्या कला सादर करतील.

रोड शोचा शेवट साबरमती आश्रमाजवळ होईल.

संध्याकाळी साडेचार वाजता मोदी आणि आबे हे साबरमती आश्रमाला भेट देतील, जिथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे.

यानंतर ते सिद्दी सैय्यद मस्जिदीला भेट देतील.  तर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी शिंजो आबे यांच्या हस्ते भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनचं उद्घाटन करण्यात येईल.

शिंजो आबे यांचा भारत दौरा

बुधवार, 13 सप्टेंबर 2017 

दुपारी 3.30 वा – अहमदाबादेतील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर आगमन

दुपारी 4.30 वा – साबरमती आश्रमाला भेट

संध्या. 6.15 वा. – सिदी सैय्यद मस्जिदीला भेट

गुरुवार 14 सप्टेंबर 2017

सकाळी 9.50 वा. – भारतातील पहिली बुलेट ट्रेन अहमदाबाद- मुंबईचं उद्घाटन

सकाळी 11.30 वा.  – दांडी कुतीरला भेट

दुपारी 12 वा. – उच्चस्तरीय चर्चा

दुपारी 1. वा – दोन्ही देशात करार आणि पत्रकार परिषद, स्थळ- महात्मा मंदिर

दुपारी 2.30 वा- भारत-जपान बिझनेस लिडर ग्रुप फोटो

दुपारी 3.45 वा – महात्मा मंदिरातील कॉन्व्हेंन्शन हॉलमधील प्रदर्शन पाहणी

रात्री 9.35 वा. – शिंजो आबे टोकियोला रवाना होणार

India News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Here’s Japanese PM Shinzo Abe’s schedule during his two-day India visit
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

SBI खातेधारकांच्या मिनिमम बॅलन्सच्या मर्यादा शिथिल
SBI खातेधारकांच्या मिनिमम बॅलन्सच्या मर्यादा शिथिल

मुंबई : ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’नं मिनिमम बॅलन्स ठेवण्याच्या अटी

यापुढे घुसखोरी केल्यास जमिनीत गाडू, भारतीय लष्करप्रमुखांचा दहशतवाद्यांना इशारा
यापुढे घुसखोरी केल्यास जमिनीत गाडू, भारतीय लष्करप्रमुखांचा...

नवी दिल्ली : सीमा ओलांडून भारतात आलात, तर जमिनीत गाडू, असा सज्जड दम

अमित शाहांची राहुल गांधींवर जोरदार टीका
अमित शाहांची राहुल गांधींवर जोरदार टीका

मुंबई : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत बोलताना भाजप

हॉस्पिटलच्या उद्घाटनाचं आमंत्रण देण्यासाठी राणे दिल्लीत : दानवे
हॉस्पिटलच्या उद्घाटनाचं आमंत्रण देण्यासाठी राणे दिल्लीत : दानवे

नवी दिल्ली  : ‘नारायण राणे यांनी त्यांच्या मतदारसंघात सुसज्ज असं

बनारस हिंदू विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने राजकारण तापलं
बनारस हिंदू विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने राजकारण...

अलाहबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदार संघातील बनारस

पंतप्रधान मोदींकडून ‘सौभाग्य’ योजनेचा शुभारंभ
पंतप्रधान मोदींकडून ‘सौभाग्य’ योजनेचा शुभारंभ

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (सोमवार) ‘सौभाग्य’

मिस व्हीलचेअर वर्ल्ड स्पर्धेसाठी भारताची डॉ. राजलक्ष्मी सज्ज
मिस व्हीलचेअर वर्ल्ड स्पर्धेसाठी भारताची डॉ. राजलक्ष्मी सज्ज

बंगळुरु : मिस व्हीलचेअर वर्ल्ड स्पर्धा यावर्षी पोलंडमध्ये पार

नारायण राणे-अमित शहांची आज भेट, राणेंसाठी भाजपचं दार उघडणार?
नारायण राणे-अमित शहांची आज भेट, राणेंसाठी भाजपचं दार उघडणार?

नवी दिल्ली: काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर नारायण राणे आज भाजपत

विनोद खन्नांच्या मृत्यूनंतर उमेदवारी न दिल्याने पत्नी भाजपवर नाराज?
विनोद खन्नांच्या मृत्यूनंतर उमेदवारी न दिल्याने पत्नी भाजपवर...

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांच्या निधनानंतर

डिंपल अखिलेश यादव यापुढे निवडणूक लढवणार नाहीत
डिंपल अखिलेश यादव यापुढे निवडणूक लढवणार नाहीत

लखनौ : समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल