खुशखबर! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता एका टक्क्याने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 1 जूनपासूनचा महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना दिला जाईल.

खुशखबर! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचारी आणि पेंशनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता एका टक्क्याने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 1 जूनपासूनचा महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना दिला जाईल.

बेसिक पे किंवा पेंशनवर सध्या मिळणाऱ्या महागाई भत्त्यावर हा एक टक्का महागाई भत्ता अतिरिक्त मिळणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या 4 टक्के महागाई भत्ता दिला जातो. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा लाभ 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह 61 लाख पेंशनधारकांना होणार आहे.

केंद्र सरकारने यापूर्वी या वर्षी मार्च महिन्यात महागाई भत्त्यात वाढ केली होती. 1 जानेवारी 2017 पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली. कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकारकडून वर्षात दोन वेळा महागाई भत्ता वाढवण्यात येतो.

किमात वेतन 21 हजार रुपये?

मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लवकरच मोठं गिफ्ट देण्याची शक्यता आहे. किमान वेतन 18 हजार रुपयांऐवजी 21 हजार रुपये करण्याबाबत सरकार विचार करत आहे. यापूर्वी सातव्या वेतन आयोगाच्या सिफारशींमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचं किमान वेतन 18 हजार रुपये ठेवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. मात्र सरकारकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

संबंधित बातमी : केंद्रीय कर्मचाऱ्यांना 18 हजारांऐवजी 21 हजार रुपये किमान वेतन?

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV