हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेसाठी मतदान, भाजप-काँग्रेसमध्ये थेट लढत

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिमाचलमध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संपूर्ण हिमाचलमध्ये 17,850 पोलीस आणि होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत.

हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेसाठी मतदान, भाजप-काँग्रेसमध्ये थेट लढत

शिमला : हिमाचल प्रदेश विधानसभेच्या ६८ जागांसाठी आज मतदान होत असून मतमोजणी 18 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. हिमाचलमध्ये 49.05 लाख मतदार असून त्यामध्ये 20 हजार नवमतदारांचा समावेश आहे. 7 हजार 521 मतदार संघांवर ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

LIVE UPDATE :

- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरुन जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन हिमाचल प्रदेशमधील नागरिकांना केलं आहे.मतदानाची वेळ सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच व्हीव्हीपीएटी मशीनचा वापर होणार आहे.

भाजपने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून प्रेमकुमार धूमल यांचं नाव जाहीर केलं आहे. तर काँग्रेसचे विद्यमान मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे.

दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिमाचलमध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संपूर्ण हिमाचलमध्ये 17,850 पोलीस आणि होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. तर केंद्रीय अर्धसैन्य दलाच्या 65 तुकड्याही इथं तैनात करण्यात आल्या आहेत. त्यासोबतच अनेक सुरक्षा दलाचे अधिकारीही या निवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत. अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी पुष्पेंद्र राजपूत यांनी दिली आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये २०१२ साली झालेल्या निवडणुकीत ६८पैकी काँग्रेसने ३६ तर भाजपने २७ जागा जिंकल्या होत्या. पाच जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. गुजरातबरोबरच हिमाचल प्रदेशचीही निवडणूक भाजपनं प्रतिष्ठेची केली आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Himanchal Pradesh assembly election and voting latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV