ताजमहलमध्ये शिव चालिसा वाचण्याचा प्रयत्न

ताजमहलात नमाज होऊ शकतं, मग आम्ही पूज का नाही करु शकत?, असा सवाल तरुणांनी विचारला.

ताजमहलमध्ये शिव चालिसा वाचण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली : ताजमहलवरुन सुरु झालेला वाद थांबायचं नाव घेत नाही. आता ताजमहल परिसरात काही हिंदुत्त्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शिव चालिसा वाचण्याचा प्रयत्न केला.

अलिगढ आणि हाथरस या ठिकाणांहून आलेल्या सहा-सात तरुणांनी सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास व्हिडीओ प्लॅटफॉर्मवर जोर-जोरात शिव चालिसा वाचण्यास सुरुवात केली. त्यावेळी तिथे हजर असलेल्या सीआयएसएफ जवान आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या (एएसआय) कर्मचाऱ्यांनी आक्षेप नोंदवला.

ताजमहलात नमाज होऊ शकतं, मग आम्ही पूजा का नाही करु शकत?, असा सवाल तरुणांनी विचारला.

त्यानंतर सीआयएसएफच्या जवानांनी तरुणांना पकडून गेस्ट रुममध्ये नेले. तिथे तरुणांनी लिखित माफीनामा दिला. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.

हाथरसमधील राष्ट्रीय स्वाभिमान दलाचा कार्यकर्ता दीपक शर्माने सांगितले, “ते लोक सोमवारी तेजोमहालयात शिव चालिसा वाचण्यासाठी गेले होते. शिव चालिसा वाचल्यानंतर ते उपवास सोडतात. त्यांना रोखलं गेलं, हे चूक आहे.”

हिंदू युवा वाहिनीचे अलिगढचे शहराध्यक्ष भारत गोस्वामी यांनी म्हटलं, “तेजोमहालयात पूजा करणाऱ्यांना रोखलं जात आहे, हे बरोबर नाही.”

भाजप आमदाराच्या वक्तव्यानंतर वाद

उत्तर प्रदेशात ताजमहलचा वाद पुन्हा उफाळून आला, तो भाजप आमदार संगीत सोम यांनी ताजमहल हा भारतीय संस्कृतीवरील एक डाग असल्याचं म्हटल्यावर. संगीत सोम म्हणाले, “आपण कोणत्या इतिहासाबद्दल बोलत आहोत?  ताजमहलचा निर्माता – शाहजहाँने स्वत:च्या वडिलांना कैद केलं होतं. त्याला हिंदू धर्म संपवायचा होता. जर हे आपल्या इतिहासाचे भाग असतील, तर ही आपल्यासाठी दुर्भाग्याची भाग आहे. आम्ही हा इतिहास बदलू”

ओवेसी काय म्हणाले होते?

संगीत सोम यांच्या या वक्तव्यानंतर MIM खासदार असदुद्दीन ओवेसींनी पलटवार केला. जर असं असेल तर लाल किल्लाही गद्दारांचं निशाण आहे, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र लाल किल्ल्यावरुन तिरंगा फडकणार का, असा सवाल ओवेसींनी उपस्थित केला होता.

ओवेसींनी ट्विट करुन, दिल्लीत हैद्राबाद हाऊसही ‘गद्दार’ने बनवलं होतं. त्यामुळे मोदी परदेशी पाहुण्यांना इथे येण्यापासून रोखतील? गद्दारांनीच लाल किल्ला उभारला होता, तिथून तिरंगा फडकावणं बंद करणार का? असे सवालही ओवेसींनी उपस्थित केले होते.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV