हिज्बुल मुजाहिद्दीनचा नवा कमांडर अब्दुल कायूम नाजरचा खात्मा

कुख्यात दहशतवादी अब्दुल कायूम नाजरचा खात्मा करण्यात भारतीय लष्कराला यश आलं आहे.

हिज्बुल मुजाहिद्दीनचा नवा कमांडर अब्दुल कायूम नाजरचा खात्मा

श्रीनगर : कुख्यात दहशतवादी अब्दुल कायूम नाजरचा खात्मा करण्यात भारतीय लष्कराला यश आलं आहे. बारामुल्लामध्ये झालेल्या चकमकीत अब्दूल नाजर ठार झाला. पाकिस्तानच्या हद्दीतून भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्न करत असताना सीमेवरच्या जवानांनी त्याला कंठस्नानं घातलं.

गेल्या 17 वर्षांपासून अब्दुल काश्मीरच्या खोऱ्यात दहशतवादी कारवायांमध्ये सक्रीय होता. जवळपास 50 जणांच्या हत्येमागाचे त्याचा हात असल्याची माहिती आहे. त्याला पकडून देणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं.


बारामुल्लाचे पोलीस आयुक्त इम्तियाज हुसैन यांनी सांगितलं की, अब्दुलवर काश्मीरमधील हिज्बुल मुजाहिद्दीनची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पाकिस्तानच्या हद्दीतून काश्मीर खोऱ्यात घुसखोरी करत असताना सुरक्षा रक्षकांनी त्याचा खात्मा केला.

सोपोर शहरातील रहिवासी असलेल्या अब्दुलला दहशतवादी कारवायात सक्रीय असल्याप्रकरणी वयाच्या 16 वर्षी सर्वात पहिल्यांदा अटक करण्यात आली होती. पण त्यानंतर त्याची 1992 मध्ये सुटका करण्यात आली.

पण 1995 मध्ये तो पुन्हा दहशतवादी कारवायांमध्ये सक्रीय झाला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तो नेहमी वेशांतर करुन पोलिसांच्या डोळ्यात धुळ फेकत होता. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी त्याच्यावर 10 लाखाचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं.

दरम्यान, कुपवाडामध्येही घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाकिस्तानच्या बॅट म्हणजे बॉर्डर ऍक्शन टीमचा कट उधळून लावण्यात आला आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV