दिल्लीतील हॉकीपटूची गोळी झाडून आत्महत्या

दिल्लीतील सरोजनी नगर परिसरात काल (मंगळवार) सकाळी 10 वाजेच्या दरम्यान रिझवान खान नावाच्या एका हॉकीपटूनं गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

By: | Last Updated: 06 Dec 2017 03:47 PM
दिल्लीतील हॉकीपटूची गोळी झाडून आत्महत्या

नवी दिल्ली : दिल्लीतील सरोजनी नगर परिसरात काल (मंगळवार) सकाळी 10 वाजेच्या दरम्यान रिझवान खान नावाच्या एका हॉकीपटूनं गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पण ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्याच्या मैत्रिणीच्या कुटुंबीयांवरच त्यांनी हा आरोप केला आहे. सोमवारी रिझवाननं मैत्रिणीच्या घरी आपली बॅग, मोबाईल आणि दोन लाख रुपये ठेवले होते.

यूपीच्या बुलंदशहरमध्ये राहणारा रिझवान जामिया मिल्लिया इस्लामिया विद्यापीठात शिकत होता. तसंच तो राज्यस्तरीय हॉकीपटूही होता. रिझवानच्या मृत्यूनं त्याच्या संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे.

दरम्यान, पोलीस या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. ही आत्महत्या आहे की हत्या या अनुशंगाने देखील पोलीस तपास करत आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: hockey player suicide in delhi latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV