हनीप्रीतला अखेर बेड्या, उद्या कोर्टात सादर करणार

हनीप्रीतसोबत आणखी एका सहकारी महिलेला अटक करण्यात आली.

हनीप्रीतला अखेर बेड्या, उद्या कोर्टात सादर करणार

चंदीगड : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला शिक्षा झाल्यानंतर फरार झालेली त्याची दत्तक मुलगी हनीप्रीतला अखेर अटक करण्यात आली आहे. हरियाणातील पंचकुला पोलिसांनी जीरकपूरजवळ हनीप्रीतला अटक केली.

"हनीप्रीत परिसरात दिसल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. दुपारी तीनच्या सुमारात जीकरपूरजवळील पटियाला रोडवर तिला अटक केली. हनीप्रीतला उद्या (बुधवार) कोर्टात हजर करणार आहोत," असं  पंचकुलाचे पोलिस आयुक्तांनी सांगितलं.

हनीप्रीतसोबत आणखी एका सहकारी महिलेला अटक करण्यात आली.
पोलिसांना चकवा देणारी हनीप्रीत अखेर जगासमोर
दरम्यान, पोलिसांना सातत्याने चकवा देत असलेली हनीप्रीत मंगळवारी 38 दिवसांनंतर न्यूज चॅनलवर आली आणि आपण निर्दोष असल्याचा दावा केला.
राम रहीमही निर्दोष असल्याचं सांगत, मी त्यांना वडिलांप्रमाणे मानते आणि आमचं नातं अतिशय पवित्र आहे, असं ती म्हणाली. तसंच बदनामी करण्यासाठी माझ्यावर आरोप लावले जात असल्याचं तिने सांगितलं.

हनीप्रीतवर नेमके आरोप काय?
राम रहीमला पळवून नेण्यासाठी कट रचल्याचा आरोप हनीप्रीतवर आहे. पोलिसांच्या मते, 25 ऑगस्टला राम रहीम जेव्हा जेलमध्ये गेला तेव्हा हनीप्रीतनं काही गुंडांच्या मदतीनं हिंसाचार घडवून आणला. ज्यामध्ये अनेकांचे प्राणही गेले. तसेच या हिंसाचाराचा फायदा घेऊन राम रहीमला पळवून नेण्याच कटही तिने रचला होता. असा पोलिसांचा दावा आहे.

हनीप्रीतवर देशद्रोहाचा गुन्हा
हनीप्रीतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल आहे. पंचकुलामध्ये हिंसा भडकावण्याच्या आरोपाखाली हनीप्रीतविरोधात सेक्टर-5 पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. साध्वींवरील बलात्कारप्रकरणात दोषी ठरवल्यानंतर राम रहीमला पोलिस कोठडीतून पळवण्याचा कट हनीप्रीतने रचला होता, असा आरोप आहे.

संबंधित बातम्या

38 दिवसांनी अखेर हनीप्रीत जगासमोर, आज सरेंडर करण्याची शक्यता

हनीप्रीत दिल्लीतच लपल्याची माहिती, अटकपूर्व जामिनासाठी अर्ज


हनीप्रीत आणि राम रहीमचे अनैतिक संबंध, हनीप्रीतच्या पतीचा आरोप


हनीप्रीत नेपाळच्या बिराटनगरमध्ये लपलेली, सुत्रांची माहिती


पोलिसांना गुंगारा देणारी हनीप्रीत नेपाळमध्ये दिसली : सूत्रभारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV