हनीप्रीतकडून पंचकुला हिंसाचाराच्या कटात सहभागी असल्याची कबुली

बाबाला शिक्षा झाली तर जगाच्या नकाशावरुनच भारताचं अस्तित्त्वच मिटवून टाकू, अशी घोषणाबाजी या व्हिडीओमध्ये आहे.

By: | Last Updated: > Wednesday, 11 October 2017 12:43 PM
Honeypreet Insan confesses to inciting violence in Panchkula after Ram Rahim’s conviction

चंदीगड : बलात्कारी बाबा राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीत इंसाकडून अखेर पोलिसांनी सत्य वदवून घेतलं. पंचकुला हिंसाचाराच्या कटात सहभागी असल्याची कबुली हनीप्रीतने दिली आहे.

माझ्याच इशाराऱ्यावरुन हिंसाचार
25 ऑगस्ट रोजी बलात्कारी बाबा गुरमीत राम रहीमला शिक्षा सुनावल्यानंतर, पंचकुलातील हिंसाचार माझ्या इशाऱ्यावरच झाल्याचं हनीप्रीतने पोलिस कोठडीत कबूल केलं. या हिंसाचारात 36 जणांचा मृत्यू झाला होता. आधी पंचकुला हिंसाचारासाठी सव्वा कोटी रुपये वाटल्याचंही तिने मान्य केलं होतं.

पंचकुला हिंसाचारासाठी नकाशा
पोलिसांच्या माहितीनुसार, हनीप्रीतनेच देशविरोधी व्हिडीओ बनवून व्हायरल केला होता. बाबाला शिक्षा झाली तर जगाच्या नकाशावरुनच भारताचं अस्तित्त्वच मिटवून टाकू, अशी घोषणाबाजी या व्हिडीओमध्ये आहे. हा पुरावा हनीप्रीतच्या मोबाइलमध्ये आहे. पंचकुलामध्ये हिंसाचार करण्यासाठी हनीप्रीतने ठरवलेला नकाशा लॅपटॉपमध्ये आहे.  पंचकुला शहराचा हा नकाशा असून त्यात बाबाला कोणत्या मार्गाने पळवता येईलं, याचं प्लॅनिंगही होतं.

कोण आहे हनीप्रीत?
हनीप्रीत ही गुरमीत राम रहीमची दत्तक मुलगी असल्याचं म्हटलं जातं. हनीप्रीतचं खरं नाव प्रियांका तनेजा आहे. तिचे वडील रामानंद तनेजा आणि आई आशा तनेजा फतेहाबादचे रहिवासी आहेत. हनीप्रीतचे वडील राम रहीमचे अनुयायी होते. आपली सर्व संपत्ती विकल्यानंतर ते डेरा सच्चा सौदामध्ये दुकान उघडलं. 14 फेब्रुवारी 1999 मध्ये हनीप्रीत आणि विश्वास गुप्ताचं सत्संगमध्ये लग्न झालं. यानंतर बाबाने हनीप्रीतला स्वत:ची तिसरी मुलगी घोषित केलं. परंतु बाबा आणि हनीप्रीतमध्ये अनैतिक संबंध असल्याचा आरोप तिचा पती विश्वास गुप्ताने केला आहे. दरम्यान, राम रहीमच्या सिनेमात तिने अभिनय आणि दिग्दर्शनही केलं आहे.

India News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Honeypreet Insan confesses to inciting violence in Panchkula after Ram Rahim’s conviction
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

मंत्र्यांच्या आधारकार्डची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडेच नाही!
मंत्र्यांच्या आधारकार्डची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडेच नाही!

मुंबई : देशातल्या सव्वाशे कोटी भारतीयांना आधारकार्ड अनिवार्य

फटाकेबंदीचा निषेध, सुप्रीम कोर्टासमोर रॉकेट सोडलं!
फटाकेबंदीचा निषेध, सुप्रीम कोर्टासमोर रॉकेट सोडलं!

नवी दिल्ली : दिल्लीत फटाक्यांच्या विक्रीवर असलेल्या बंदीचा निषेध

‘ताजमहल भारतीय मजुरांनी उभारला, त्याच्या सुरक्षेची जबाबदारी आमचीच’
‘ताजमहल भारतीय मजुरांनी उभारला, त्याच्या सुरक्षेची जबाबदारी...

लखनऊ : उत्तर प्रदेशमधील भाजप आमदार संगीत सोम यांच्या

भाजपकडे सर्वाधिक संपत्ती, बसपाची मोठी भरारी, राष्ट्रवादीची किती?
भाजपकडे सर्वाधिक संपत्ती, बसपाची मोठी भरारी, राष्ट्रवादीची किती?

 नवी दिल्ली: देशातील राजकीय पक्षांची संपत्ती किती आणि त्यांच्या

ताजमहल वादावरुन आझम खान यांचंही वादग्रस्त विधान
ताजमहल वादावरुन आझम खान यांचंही वादग्रस्त विधान

नवी दिल्ली : भाजप आमदार संगीत सोम यांनी ताजमहलबद्दल केलेल्या

90 टक्के IAS अधिकारी कामं करत नाहीत : केजरीवाल
90 टक्के IAS अधिकारी कामं करत नाहीत : केजरीवाल

नवी दिल्ली : 90 टक्के आयएएस अधिकारी कामचुकार आहेत. त्यांच्याकडून फक्त

अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मूर्तीच्या भात्यात शिया वक्फ बोर्डाचे चांदीचे बाण
अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मूर्तीच्या भात्यात शिया वक्फ...

लखनऊ : उत्तर प्रदेशमधील योगी सरकार अयोध्येतील शरयू तिरी 100 फुटी

जामिनावर सुटलेल्या माय-लेकांनी विकासावर बोलू नये : पंतप्रधान मोदी
जामिनावर सुटलेल्या माय-लेकांनी विकासावर बोलू नये : पंतप्रधान मोदी

गांधीनगर : राहुल गांधींच्या ‘विकास पागल हो गया’ या टीकेला नरेंद्र

चार वर्षांनंतर तलवार दाम्पत्य तुरुंगातून बाहेर
चार वर्षांनंतर तलवार दाम्पत्य तुरुंगातून बाहेर

लखनौ : आरुषी-हेमराज हत्याकांडाप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत

पुढच्या दिवाळीपर्यंत अयोध्येत राम मंदिर उभे राहिल, सुब्रमण्यम स्वामींना विश्वास
पुढच्या दिवाळीपर्यंत अयोध्येत राम मंदिर उभे राहिल, सुब्रमण्यम...

नवी दिल्ली : भाजपचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी