नाताळच्या सेलिब्रेशनसाठी गोव्यात पर्यटकांची गर्दी

अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेला नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोमंतकिय सज्ज झाले आहेत. गोव्यातील बाजारपेठा खरेदीसाठी नागरिकांनी फुलून गेल्या आहेत.

नाताळच्या सेलिब्रेशनसाठी गोव्यात पर्यटकांची गर्दी

पणजी : अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेला नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोमंतकिय सज्ज झाले आहेत. गोव्यातील बाजारपेठा खरेदीसाठी नागरिकांनी फुलून गेल्या आहेत.

नाताळ आणि नवीन वर्ष साजरे करण्यासाठी देश विदेशातील लाखो पर्यटक गोव्यात दाखल होण्यास सुरुवात झाली असून पूढचे काही दिवस गोव्यात पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळणार आहे. सलगच्या सुट्ट्यांमुळे गोव्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात येण्यास सुरुवात झाली आहेत. तसंच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत गोव्यातील बहुतेक सगळी हॉटेल्स हाऊसफुल्ल झाली आहेत.

पर्यटन हंगामात हॉटेल्स आणि इतर सेवांचे दर जास्त असूनदेखील पर्यटकांच्या उत्साहावर त्याचा काहीच परिणाम झालेला नाही.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: huge rush in goa for christmas celebration latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV