पॉर्न साईटच्या प्रिमियम सदस्यत्वासाठी स्वतःचा व्हिडिओ अपलोड

आपल्या कामवाली बाईसोबत शारीरिक संबंध ठेवतानाचे क्षण नागेश्वरने तिच्या नकळत चित्रित केले. त्यानंतर हा व्हिडिओ त्याने पॉर्न वेबसाईटवर अपलोड केला.

पॉर्न साईटच्या प्रिमियम सदस्यत्वासाठी स्वतःचा व्हिडिओ अपलोड

हैदराबाद : पॉर्न वेबसाईटचं प्रिमियम सदस्यत्व मिळवण्यासाठी हैदराबादमधील एका आयटी कर्मचाऱ्याने हद्द गाठली. एका प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनीतील 28 वर्षीय कर्मचाऱ्याने स्वतःच्याच खाजगी क्षणांचा व्हिडिओ वेबसाईटवर अपलोड केला. आरोपी नागेश्वर रावला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

आपल्या कामवाली बाईसोबत शारीरिक संबंध ठेवतानाचे क्षण नागेश्वरने तिच्या नकळत चित्रित केले. त्यानंतर हा व्हिडिओ त्याने पॉर्न वेबसाईटवर अपलोड केला. पीडितेच्या मुलाच्या मित्राने हा व्हिडिओ पाहिला आणि ही माहिती दिली. त्यानंतर पीडितेने नागेश्वर विरोधात पोलिसात तक्रार दाखल केलीय

संबंधित पॉर्न वेबसाईटचा प्रिमियम सदस्य होण्यासाठी व्हिडिओ अपलोड करणं अनिवार्य असतं. मोबदला म्हणून वेबसाईटकडून युझरला पैसे मिळतात. व्हिडिओचं योगदान देणाऱ्या सदस्यांना पॉईंट्स दिले जातात. आरोपीने अपलोड केलेला हा पहिलाच व्हिडिओ होता.

व्हिडिओ अपलोड करण्यापूर्वी तक्रारदार महिला आणि आरोपीमध्ये कोणतंही भांडण नव्हतं. त्यामुळे केवळ प्रिमियम मेंबरशीप मिळवणं, हा त्याचा एकमेव उद्देश असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. हा व्हिडिओ वेबसाईटवरुन हटवण्यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Hyderabad techie arrested for uploading obscene video with maid on adult website latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV