भाजपमध्ये येण्यासाठी मला एक कोटींची ऑफर : नरेंद्र पटेल

नरेंद्र पटेल हे पाटीदार समाजाचे नेते असून, हार्दिक पटेलचे निकटवर्तीय आहेत.

भाजपमध्ये येण्यासाठी मला  एक कोटींची ऑफर : नरेंद्र पटेल

गांधीनगर (गुजरात) :  गुजरातमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांचा धुरळा उडतो आहे. अशातच भाजपला सणसणीत चपराक ठरणारी घटना घडलीय. पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलची साथ सोडून भाजपमध्ये सामील झालेल्या नरेंद्र पटेल यांनी भाजपला पहिल्याच दिवशी घरचा आहेर दिला आहे.

नरेंद्र पटेल हे पाटीदार समाजाचे नेते असून, हार्दिक पटेलचे निकटवर्तीय आहेत.

"भाजपमध्ये सामील करुन घेण्यासाठी मला एक कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली. यातील 10 लाख रुपयांची रक्कम पक्षप्रवेशासाठी सुरुवातीलाच देण्यात आली. उर्वरित 90 लाख रुपये सोमवारी (23 ऑक्टोबर) देण्यात येणार होते.", असा घणाघाती आरोप नरेंद्र पटेल यांनी केला.

narendra patel 1गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते असलेले वरुण पटेल यांनी भाजपमध्ये सामील होण्यासाठी एक कोटी रुपये देण्याची ऑफर दिली, असा आरोपही नरेंद्र पटेल यांनी केला आहे. मात्र वरुण पटेल यांनी नरेंद्र पटेलांचे आरोप फेटाळले असून, नरेंद्र पटेल यांना काँग्रेसचे एजंट असल्याचे म्हटले आहे.

दुसरीकडे हार्दिक पटेलचे निकटवर्तीय वरुण पटेल आणि रेश्मा पटेल यांनी भाजपत प्रवेश केला आहे. दरम्यान यांनाही भाजपनं आमीष दाखवूनचं प्रवेश दिला असल्याचा आरोप हार्दिक पटेलनं भाजपवर केला आहे.

गुजरात विधानसभा तोंडावर आल्या असल्यानं भाजप उमेदवार खरेदी करून मोर्चेबांधणी करत असल्याचं दिसून येत आहे. त्यात पाटीदार समाज हा गुजरात निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावणारा समूह मानला जातो आणि हार्दिक पटेल हा या समाजाचा सध्या सर्वात लोकप्रिय नेता आहे. हार्दिक पटेल सध्या सक्रीय राजकारणात नसला, तरी त्याने काँग्रेसच्या बाजूने उघड भूमिका घेतली आहे. त्यामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. त्यात आता नरेंद्र पटेलांनीही पहिल्याच दिवशी घरचा आहेर दिल्याने भाजपची नाचक्की झाल्याचे दिसून येते आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV