फोन बंद केला तरीही आधारशी जोडणार नाही : ममता बॅनर्जी

तृणमूल काँग्रेसच्या बैठकीत ममता बॅनर्जी यांनी हा इशारा दिला.

फोन बंद केला तरीही आधारशी जोडणार नाही : ममता बॅनर्जी

नवी दिल्ली : सरकारने मोबाईल क्रमांक आधारने व्हेरिफाईड करणं अनिवार्य केलं आहे. मात्र माझा मोबाईल क्रमांक बंद केला तरीही चालेल, मात्र आधारशी जोडणार नाही, असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता  बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

तृणमूल काँग्रेसच्या बैठकीत ममता बॅनर्जी यांनी हा इशारा दिला. कोणत्याही परिस्थितीत मोबाईल क्रमांक आधारशी जोडला जाणार नाही. संबंधित विभागाने फोन बंद केला तरीही हरकत नाही, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

https://twitter.com/ANI/status/923128479037530112

फेब्रुवारी 2018 पर्यंत सिम व्हेरिफिकेशन करायचं होतं. मात्र आधार अनिवार्य करण्याची मुदत 31 मार्च 2018 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

आधार कार्ड अनिवार्य करण्याची मुदत वाढवली

केंद्र सरकारने आधार कार्ड अनिवार्य करण्याची मुदत 31 डिसेंबरहून 31 मार्च 2018 केली आहे. आधार नंबर न देणाऱ्या नागरिकांना सध्या कोणत्याही लाभापासून वंचित ठेवलं जाणार नाही, अशी माहिती महाधिवक्त्यांनी सुप्रीम कोर्टात दिली.

आधार कार्डच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. बँक खात्यांसोबतच इतर सरकारी योजनांसाठी आधार नंबर देण्यासाठी दबाव टाकला जात आहे, असा दावा याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात केला होता.

याचिकाकर्त्यांनी गोपनियतेच्या अधिकाराचा दाखला देत संपूर्ण प्रकरणावर तातडीने सुनावणी करण्याची विनंती केली. सुप्रीम कोर्ट सोमवारी पुन्हा एकदा या प्रकरणावर सुनावणी करणार आहे.

संबंधित बातम्या :

तुमचं बँक खातं आणि आधार लिंक आहे का? असं चेक करा


आधार कार्ड अनिवार्य करण्याची मुदत वाढवली

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: I will not link Aadhaar with phone, if they want to disconnect my phone, let them: West Bengal CM Mamata Banerjee
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV