इंद्रा नूयी आयसीसीच्या पहिल्या स्वतंत्र महिला संचालक

आयसीसीच्या संचालकपदाचा स्वतंत्र कार्यभार एका महिलेच्या हाती सोपवण्याचा निर्णय आयसीसी कौन्सिलनं गेल्या वर्षी जून महिन्यात घेतला होता.

इंद्रा नूयी आयसीसीच्या पहिल्या स्वतंत्र महिला संचालक

मुंबई : 'पेप्सिको'च्या अध्यक्ष आणि सीईओ इंद्रा नूयी यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलच्या पहिल्या संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. इंद्रा नूयी या जून महिन्यापासून आयसीसीच्या संचालकपदाचा स्वतंत्र कार्यभार स्वीकारतील.

आयसीसीच्या संचालकपदाचा स्वतंत्र कार्यभार एका महिलेच्या हाती सोपवण्याचा निर्णय आयसीसी कौन्सिलनं गेल्या वर्षी जून महिन्यात घेतला होता. आयसीसीच्या शुक्रवारच्या बैठकीत त्या पदावर इंद्रा नूयी यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.

इंद्रा नूयी हे उद्योगविश्वातलं एक मोठं नाव आहे. जगातल्या सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत फॉर्च्युन मॅगझिननं त्यांचा सातत्यानं समावेश केला आहे.

पेप्सिकोच्या अध्यक्ष आणि सीईओ या नात्यानं त्यांच्यावर फूड अँड बेव्हरेज विभागाची जागतिक जबाबदारी आहे. सदर विभागात 22 ब्रँड्सचा समावेश असून, प्रत्येक ब्रँडच्या उद्योगात वर्षाला अंदाजे एक अब्ज डॉलर्सची उलाढाल होत असते.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: ICC appoints Indra Nooyi as its first independent female director latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV