साखरेवरील आयातशुल्कात दुपटीने वाढ : सूत्र

ठोक बाजारात साखरेचे दर घसरले होते. या दर घसरणीवर उतारा म्हणून केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे.

साखरेवरील आयातशुल्कात दुपटीने वाढ : सूत्र

नवी दिल्ली : केंद्र सरकारनं साखरेवरील आयातशुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सारखेचे घसरलेले दर, कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणारा फटका यावर उपाय म्हणून केंद्रानं हा निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.

ठोक बाजारात साखरेचे दर घसरले होते. या दर घसरणीवर उतारा म्हणून केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे.

आयातशुल्कात 50 टक्क्यांऐवजी 100 टक्के इतकी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तानातून होत असलेल्या स्वस्त साखरेवर यामुळे मर्यादा येणार आहेत. याचा फायदा कारखानदारांना होणार आहे. त्याचबरोबर ऊसाला योग्य भाव देणंही कारखानदारांना शक्य होईल.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Import duty increased on sugar, says source
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: Import Duty sugar आयात शुल्क साखर
First Published:
LiveTV