डोकलाम वाद : सिक्कीम, अरुणाचल सीमेवर भारतानं सैन्य वाढवलं!

चीन वारंवार युद्धाची धमकी देत असल्यानं भारतानंही सीमेवर आपलं सैन्य पाठवलं आहे.

By: | Last Updated: > Friday, 11 August 2017 11:36 PM
India deploys more troops along in Sikkim, Arunachal latest update

प्रातिनिधिक फोटो

नवी दिल्ली : डोकलाम वादाच्या पार्श्वभूमीवर भारतानं अधिकचं सैन्य सीमेवर पाठवलं आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं याबाबतच्या वृत्ताला दुजोराही दिला आहे. चीनकडून वारंवार मिळणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर भारतानं हे मोठं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या सीमेवर भारतानं अधिकचं सैन्य तैनात केलं आहे. पीटीआयनं याबाबतच वृत्त दिलं आहे.

 

आतापर्यंत या भागात मोजकेच सैनिक भारतानं तैनात केले होते. मात्र, चीन वारंवार युद्धाची धमकी देत असल्यानं भारतानंही सीमेवर आपलं सैन्य पाठवलं आहे.

 

दरम्यान, असं असलं तरीही डोकलाममध्ये मात्र, अधिक जवान तैनात करण्यात आलेले नाहीत. डोकलाम परिसरात रस्ता बनवण्याचा चीनचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्यांच्या या गोष्टीला भारतानं विरोध केला आहे. भूताननं देखील चीनला विरोध केला आहे.

 

‘डोकलाम हा तुमचा नाही तर आमचा भाग आहे.’ असं म्हणत भूतानने चीनला तोंडावर पाडलं आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं काही दिवसापूर्वी डोकलाम हा आपलाच भाग असून, भूताननंही मान्य केल्याचा दावा केला होता. त्यानंतर आज भूताननं चीनला हे प्रत्युत्तर दिलं आहे.

 

चीननं या भागात रस्ता निर्मिती करणं हे 1988 आणि 1998 च्या कराराचं उल्लंघन असल्याचंही भूतानने म्हटलं आहे. भूतानने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे की, 16 जून 2017 रोजी चीनी सैन्याने डोकलाम भागात रस्त्याचं काम सुरु केलं. मात्र चीनकडून 1988 आणि 1998 च्या सीमासुरक्षा कराराचं उल्लंघन होत आहे.

 

दरम्यान, चीन सातत्याने डोकलाम हा आपलाच भाग असल्याचा दावा करत आहे. मात्र त्याला भूतानची पुष्टी नव्हती. पण भूताननेही मान्य केल्याचा खोटारडेपणा चीनने माध्यमांसमोर व्यक्त केला होता. आता भूतानच्या दाव्यामुळे चीन चांगलंच तोंडावर आपटलं आहे.

 

वादाची सुरुवात

 

चीनने जेव्हा चुंबी खोऱ्यात याटुंगमध्ये डोकलाम परिसरात रस्ते बांधणीचं काम हाती घेतलं. त्यावेळी भारतानं त्याचा कडाडून विरोध केला. पण चीननं या विरोधाला वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या. म्हणून या भागावर लक्ष ठेवण्यासाठी भारतानं दोन बंकर उभारले. पण चिनी सैन्यानं भारताचे हे दोन्ही बंकर उद्ध्वस्त केली. त्यानंतर भारतीय लष्कराने आपली ‘रिइनफोर्समेंट’ म्हणजे लष्कराची एक मोठी तुकडी या भागात तैनात केली, त्यानंतर दोन्ही देशातील सैन्यात तणाव वाढला.

 

संबंधित बातम्या :

 

डोकलाम आमचाच, भूतानने चीनला तोंडावर आपटलं!

भारत-चीन वादाचं नेमकं कारण असलेलं डोकलामचं ‘ए’ टू ‘झेड’

युद्धासाठी तयार राहाचीनच्या राष्ट्रपतींचे लष्कराला आदेश

आमच्या लष्कराला हरवणं अशक्यचिनी लष्कराच्या प्रवक्त्याची दर्पोक्ती

भारत-चीन वादाचं नेमकं कारण असलेलं डोकलामचं ‘ए’ टू ‘झेड’

बिजिंगमधील राजदुतांच्या परिषदेत चीनची भारताला धमकी

…तर पाकिस्तानच्या विनंतीवर काश्मीरमध्ये सैन्य घुसवू : चीनी मीडिया

चिनी दूतावासाकडून भारतात येणाऱ्या नागरिकांसाठी ‘ट्रॅव्हल अलर्ट’ जारी

G-20 : मोदी आणि शी जिनपिंग यांची भेट, डोकलाम प्रश्नावरही चर्चा : सूत्र

चीनच्या ‘ड्रॅगन’वर भारताच्या ‘रुक्मिणी’ची नजर

सिक्कीममधून भारताने सैन्य हटवावं, चीनच्या उलट्या बोंबा

…अन्यथा 1962 पेक्षा गंभीर परिणाम भोगावे लागतील, चिनी मीडियाची पुन्हा धमकी

हिंदी महासागरात चीनच्या कुरापती, युद्धनौका तैनात

India News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:India deploys more troops along in Sikkim, Arunachal latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

'लष्कर-ए-तोयबा'चा कमांडर अयुब लेलहारीला कंठस्नान
'लष्कर-ए-तोयबा'चा कमांडर अयुब लेलहारीला कंठस्नान

नवी दिल्ली : भारतीय सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तोयबाचा कुख्यात दहशतवादी

हिजबुल मुजाहिद्दीन अमेरिकेकडून दहशतवादी संघटना घोषित
हिजबुल मुजाहिद्दीन अमेरिकेकडून दहशतवादी संघटना घोषित

नवी दिल्ली : काश्मिर खोऱ्यात दहशतवादी कारवाया करणाऱ्या हिजबुल

5 रुपयात नाश्ता, 10 रुपयात जेवण.. बंगळुरुत ‘इंदिरा कॅन्टीन’ सुरु
5 रुपयात नाश्ता, 10 रुपयात जेवण.. बंगळुरुत ‘इंदिरा कॅन्टीन’ सुरु

बंगळुरु : कामगार आणि गरिबांना स्वस्तात जेवण मिळावं यासाठी बंगळुरूत

स्वातंत्र्यदिनाचं माझं भाषण प्रसारित केलं नाही, त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांचा आरोप
स्वातंत्र्यदिनाचं माझं भाषण प्रसारित केलं नाही, त्रिपुराच्या...

अगरताळा : स्वातंत्र्यदिनानिमित्तानं केलेलं भाषण दूरदर्शन आणि

मित्रांची बाईक रेस, हेल्मेटला कॅमेरा, भिंतीला धडकून जीव गेला!
मित्रांची बाईक रेस, हेल्मेटला कॅमेरा, भिंतीला धडकून जीव गेला!

नवी दिल्ली: दिल्लीत मित्रांसोबत लावलेली बाईक रेस एका तरुणाच्या आणि

'लव्ह जिहाद' प्रकरणाचा तपास NIA ने करावा, सुप्रीम कोर्टाचे आदेश
'लव्ह जिहाद' प्रकरणाचा तपास NIA ने करावा, सुप्रीम कोर्टाचे आदेश

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने केरळमधील कथित लव्ह जिहाद प्रकरणाचा

'रोहित वेमुला दलित नव्हता, नैराश्येतून त्याची आत्महत्या'
'रोहित वेमुला दलित नव्हता, नैराश्येतून त्याची आत्महत्या'

नवी दिल्ली: हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुला दलित

श्रीनगरच्या लाल चौकात महिलेकडून 'भारत माता की जय'चे नारे
श्रीनगरच्या लाल चौकात महिलेकडून 'भारत माता की जय'चे नारे

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या लाल चौकात एका महिलेने ‘भारत माता की

बिहारमध्ये पुराचं थैमान, 56 जणांचा मृत्यू, 70 लाख नागरिकांना फटका
बिहारमध्ये पुराचं थैमान, 56 जणांचा मृत्यू, 70 लाख नागरिकांना फटका

पाटणा: बिहारमध्ये आलेल्या महापुराने आतापर्यंत 56 जणांचा बळी घेतला

राहुल गांधींपाठोपाठ सोनिया गांधी हरवल्याचे पोस्टर
राहुल गांधींपाठोपाठ सोनिया गांधी हरवल्याचे पोस्टर

लखनऊ : काही दिवसांपूर्वी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींच्या