जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या यादीत भारत सहावा

2017 साली भारत हा सर्वात चांगली कमाई करणारा देश असल्याचं अहवालात म्हटलं आहे.

जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या यादीत भारत सहावा

न्यूयॉर्क : जगातील श्रीमंत देशांच्या यादीत भारताचा सहावा क्रमांक लागतो. भारताची संपत्ती 8 हजार 230 अब्ज डॉलर इतकी आहे. अमेरिका जगातील सर्वात श्रीमंत देश ठरला आहे. न्यू वर्ल्ड वेल्थच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे.

या अहवालात देशातल्या संपत्तीमध्ये नागरिकांच्या खासगी संपत्तीचा समावेश असून सरकारी संपत्ती वगळण्यात आली आहे. 64 हजार 584 अब्ज डॉलर इतकी संपत्ती असलेला अमेरिका हा सर्वात धनाढ्य देश आहे.

या यादीत चीन दुसऱ्या तर जपान तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने फ्रान्स, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, इटली या देशांनाही मागे टाकलं आहे.

2017 साली भारत हा सर्वात चांगली कमाई करणारा देश असल्याचं अहवालात म्हटलं आहे. 2007 साली भारताची संपत्ती 3,165 अब्ज डॉलर होती. एका दशकात ती 160 टक्क्यांनी वाढून 8 हजार 230 अब्ज डॉलरवर गेली आहे.

2016 मध्ये भारताची संपत्ती 6 हजार 584 अब्ज डॉलर होती. म्हणजे वर्षभरात या संपत्तीत 25 टक्क्यांनी वाढ पाहायला मिळत आहे.

भारतामध्ये एकूण 20 हजार 730 कोट्यधीश व्यक्ती आहेत. कोट्यधीशांचा विचार करता भारत जगात सातव्या क्रमांकावर आहे. तर देशात 119 अब्जाधीश आहेत. सर्वाधिक अब्जाधीश असलेल्या देशांच्या यादीत भारताचा अमेरिका आणि चीननंतर तिसरा क्रमांक लागतो.


क्रमांक देश संपत्ती (अब्ज डॉलरमध्ये)
1 अमेरिका 64 हजार 584
2 चीन 24 हजार 803
3 जपान 19 हजार 522
4 ब्रिटन 9 हजार 919
5 जर्मनी 9 हजार 660
6 भारत 8 हजार 230
7 फ्रान्स 6 हजार 649
8 कॅनडा 6 हजार 393
9 ऑस्ट्रेलिया 6 हजार 142
10 इटली 4 हजार 276

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: India on the sixth rank in World’s richest countries latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV