हरक्युलस ते जॅग्वार, लढाऊ विमानांचा लखनौ-आग्रा एक्स्प्रेस वेवर युद्धाभ्यास

वायुदलाची 20 फायटर विमानं, सुखोई 30, हरक्युलस, जॅग्वार, मिराज आणि मिग यांसारख्या लढाऊ विमानांना महामार्गावर लँड होताना पाहणं, ही पर्वणी ठरत आहे.

हरक्युलस ते जॅग्वार, लढाऊ विमानांचा लखनौ-आग्रा एक्स्प्रेस वेवर युद्धाभ्यास

लखनौ : युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास देशातल्या महामार्गाचा विमानांसाठी रन वे म्हणून वापर व्हावा, यासाठी लखनौ-आग्रा महामार्गावर हवाईदलाची लढाऊ विमानं टच डाऊन म्हणजेच लँडिंग करत टेक ऑफ करत आहेत.

लखनौ-आग्रा हायवेवर भारतीय हवाई दलाच्या विमानांनी एक-एक करुन लँडिंग केलं. वायुदलाची 20 फायटर विमानं, सुखोई 30, हरक्युलस, जॅग्वार, मिराज आणि मिग यांसारख्या लढाऊ विमानांना महामार्गावर लँड होताना पाहणं, ही पर्वणी ठरत आहे.

युद्धस्थितीत रनवेचं नुकसान झाल्यास शत्रूवर पलटवार करण्यासाठी ही रणनीती महत्त्वाची ठरते. 1965 साली झालेल्या युद्धात पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी बॉम्ब टाकून भारताच्या एअरबेसची नासधूस केली होती. त्यामुळे भारतीय वायुसेनेला ऑपरेशन करताना अडचणी आल्या.

आधुनिक युद्धशास्त्रात लढाऊ विमानांना लँडिंग ग्राऊंड म्हणून एक्स्प्रेस वे आणि हायवे वापरण्यास तयार केलं जातं. फक्त भारतच नाही, तर पाकनेही 2000 मध्ये अशा प्रकारचं ड्रिल केलं होतं. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, चीन, उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया या देशांनीही हा युद्धाभ्यास केला आहे.

वायुदलाच्या युद्धाभ्यासामुळे दुपारी दोन वाजेपर्यंत लखनौ-आग्रा महामार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

गेल्या वर्षी हवाईदलाच्या आठ लढाऊ विमानांनी इथून टेक ऑफ केलं होतं. आपत्कालीन परिस्थितीत लढाऊ विमानांना लँडिंगसाठी रनवे उपलब्ध नसल्यास लखनौ-आग्रा हायवेवर विमानांना लँडिंग करता यावं, यासाठी हा रनवे तयार करण्यात आला आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV