'माझ्या देशातून चालता हो,' अमेरिकेत भारतीय इंजिनिअरची हत्या

By: | Last Updated: > Saturday, 25 February 2017 11:04 AM
Indian engineer shot dead by American

वॉशिंग्टन : अमेरिकेमध्ये भारतीय इंजिनिअर श्रीनिवासन कुचीभोतला यांची वर्णद्वेशातून हत्या करण्यात आली आहे. कन्सास शहरातल्या ऑस्टिन बार अँड ग्रीलमध्ये ही घटना घडली.

मुळचा हैदराबादचा असलेल्या 32 वर्षीय श्रीनिवासला ‘माझ्या देशातून चालता हो’ असं ओरडत एका निवृत्त सैनिकाने गोळ्या झाडल्या. अॅडम प्युरिन्टन असं या हल्लेखोराचं नाव असून त्याला मिसूरी राज्यातून अटक करण्यात आली आहे.

या हल्ल्यात श्रीनिवासनचा भारतीय मित्र आलोक मदासानी गंभीर जखमी झाला आहे. तर त्यांचा तिसरा अमेरिकन सहकारी इयान ग्रीलोट या दोघांना वाचवण्याच्या प्रयत्नात किरकोळ जखमी झाला आहे.

स्थानिक मीडियानुसार वर्णद्वेशातून हा झाल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. गोळी झाडण्यापूर्वी अॅडम प्युरिन्टन ‘माझ्या देशातून निघून जा’ असं ओरडला होता.

अमेरिकेतील भारतीयांमध्ये तणाव
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांवर टीका होत असताना या घटनेमुळे अमेरिकेत खळबळ माजली आहे. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष बनल्यानंतर वर्णद्वेष वाढला आहे. यावेळी भारतीय वंशाचे नागरिक त्याचा बळी ठरत आहेत. या घटनेनंतर अमेरिकेतील भारतीयांमध्ये तणावाचं वातावरण आहे.

परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
दरम्यान अमेरिकेतील भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी जखमी आलोकची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संपूर्ण घटनेवर शोक व्यक्त केला आहे. तसंच श्रीनिवासच्या वडील आणि भावाशी बोलून कुटुंबीयांचं सांत्वन केलं आहे. श्रीनिवासचं पार्थिव भारतात आणण्यासाठी संपूर्ण तयारी केल्याचंही स्वराज यांनी सांगितलं.

First Published:

Related Stories

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 28/06/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 28/06/2017

युरोपमध्ये पुन्हा सायबर हल्ला, बँका, कंपन्यांसह ब्रिटीश

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानींचा पगार किती?
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानींचा पगार किती?

मुंबई : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा पगार

महिलांनी रेपच्या बदल्यात जवानांची गुप्तांगं कापली, आझम बरळले
महिलांनी रेपच्या बदल्यात जवानांची गुप्तांगं कापली, आझम बरळले

लखनऊ: वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या समाजवादी पक्षाचे

पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी उरले फक्त दोन दिवस!
पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी उरले फक्त दोन दिवस!

नवी दिल्ली : इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांवर आता पॅन कार्ड नंबर आधार

राष्ट्रपती निवडणुकीसाठी यूपीएकडून मीरा कुमार यांचा अर्ज दाखल
राष्ट्रपती निवडणुकीसाठी यूपीएकडून मीरा कुमार यांचा अर्ज दाखल

नवी दिल्ली: राष्ट्रपतीपदासाठीच्या यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार

लेह-लडाखपर्यंत रेल्वेचं जाळं, सर्वात उंचावरील रेल्वेमार्ग ठरणार
लेह-लडाखपर्यंत रेल्वेचं जाळं, सर्वात उंचावरील रेल्वेमार्ग ठरणार

लेह : चीनपासून वाढता धोका पाहता मोदी सरकारने रेल्वेचं जाळं आता

युरोपमध्ये पुन्हा सायबर हल्ला, भारतालाही धोका
युरोपमध्ये पुन्हा सायबर हल्ला, भारतालाही धोका

मुंबई : वॉनाक्रायच्या दहशतीच्या महिन्याभरानंतर नव्या पीटरॅप

पासपोर्टचे रंग बदलले म्हणून रक्ताची नाती मिटत नाहीत : मोदी
पासपोर्टचे रंग बदलले म्हणून रक्ताची नाती मिटत नाहीत : मोदी

हेग : पासपोर्टचे रंग बदलले म्हणून रक्ताची नाती मिटत नाहीत, असे म्हणत

जीएसटीनंतर वीज दर वाढणार नाहीत : पियुष गोयल
जीएसटीनंतर वीज दर वाढणार नाहीत : पियुष गोयल

नवी दिल्ली : जीएसटीनंतर वीज बिल वाढण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.

भारताकडे ग्लोबल इकॉनॉमिक पॉवर, नेदरलँडच्या पंतप्रधानांकडून मोदींचं स्वागत
भारताकडे ग्लोबल इकॉनॉमिक पॉवर, नेदरलँडच्या पंतप्रधानांकडून...

अॅमस्टरडॅम : अमेरिका दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट