लिंग परिवर्तन करणं नौदलातील जवानाला महागात, नोकरी गमावली

लिंग परिवर्तनामुळे भारतीय नौदलातील जवानाला आपली नोकरी गमवावी लगली आहे. सेवा नियमांचं उल्लंघन केल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली.

लिंग परिवर्तन करणं नौदलातील जवानाला महागात, नोकरी गमावली

नवी दिल्ली : लिंग परिवर्तन करणं भारतीय नौदलातील जवानाला चांगलंच महागात पडलं आहे. लिंग परिवर्तनामुळे त्याला आपली नोकरी गमवावी लगली आहे. सेवा नियमांचं उल्लंघन केल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली.

काही दिवसांपूर्वी मीडियाला दिलेल्या मुलाखतीत मनीष गिरीने आपण जन्मत:च पुरुष असल्याचं सांगितलं होतं. तो सात वर्षांपूर्वी इस्टर्न नेवल आघाडीवर मरीन इंजिनयरमध्ये जवान म्हणून रुजू झाला. 2016 मध्ये त्याच्यावर विजागमध्ये एका डॉक्टराच्या सल्ल्यानुसार उपचार होते. उपचारासाठी त्याने वैयक्तीक सुट्टी घेतली होती. पण यावेळी त्याने लिंग परिवर्तन करुन घेतले.

सुट्टीवरुन परतल्यानंतर मनीष विशाखापट्टणममध्ये नौदलाच्या सेवेत स्त्री म्हणून रुजू झाला. यावेळी त्याने आपले केसही वाढवले होते. शिवाय, साडी परिधान करण्यास सुरुवात केली होती. यानंतर त्याचं लिंग परिवर्तनासंदर्भातील अहवाल संरक्षण मंत्रालयाकडे पाठवण्यात आला.

यानंतर त्याला कामावरुन कमी करण्यात आलं. नौदलाच्या वतीने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, सद्यस्थितीतील सेवा नियम आणि अटी, तसेच मनीषचे लिंग परिवर्तनाच्या स्थितीमुळे त्याला सेवेतून कमी करण्यात येत आहे.

दरम्यान, नौदलात नाविक पदावर पुरुषांची नियुक्ती करण्यात येते. पण नौदलासमोर असे प्रकरण पहिल्यांदाच घडले आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV