UN मधील भारताच्या अधिकारी एनम गंभीर यांचा मोबाईल चोरट्यांनी लांबवला

शनिवारी रात्री दोन बाईकस्वारांनी रस्ता विचारण्याच्या बहाण्याने, एनम यांचा मोबाईल फोन हातोहात लांबवला.

UN मधील भारताच्या अधिकारी एनम गंभीर यांचा मोबाईल चोरट्यांनी लांबवला

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र संघातील भारताच्या प्रतिनिधी एनम गंभीर यांचा मोबाईल चोरल्याची घटना घडली आहे. शनिवारी रात्री दोन बाईकस्वारांनी रस्ता विचारण्याच्या बहाण्याने, एनम यांचा मोबाईल फोन हातोहात लांबवला.

एनम गंभीर न्यूयॉर्कमध्ये कार्यरत असून, सध्या त्या सुट्टीवर मायदेशी परतल्या आहेत. एनम यांच्यासोबत ही घटना घडली, त्यावेळी त्यांच्या आई देखील त्यांच्यासोबत होत्या.

या घटनेबद्दल एनम यांचे वडील जगदीश कुमार यांनी सांगितलं की, चोरीला गेलेल्या आयफोनमध्ये अमेरिकेत रजिस्टर असलेलं सिमकार्ड, आणि काही महत्त्वाची सरकारी कागदपत्र सेव्ह होती.

जगदीश कुमार गंभीर यांनी पुढे सांगितलं की, “ही घटना रोहिणी सेक्टर-7 (ए-ब्लॉक) मधील त्यांच्या घराजवळ झाली. जवळपास रात्री 11.20 वाजता मी, माझी पत्नी आणि मुलगी शतपावली करता-करता जवळच्या वात्सल्य मंदिरापर्यंत पोहोचलो. त्यावेळी दोन बाईकस्वार तरुण त्यांच्याजवळ येऊन हानुमान मंदिराचा रास्ता विचारु लागले. एनम हाताने दिशा दाखवत, त्यांना रस्ता दाखवत होत्या. त्याचवेळी बाईकवरील एका तरुणाने, एनम यांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेत पोबारा केला.”

दरम्यान, या घटनेनंतर एनम यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पण अंधार असल्यामुळे चोरट्यांना नीट पाहता आलं नसल्याचं त्यांनी आपल्या जबाबात म्हटलं आहे.

दुसरीकडे राजधानी दिल्लीत चेन स्नॅचिंगच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. 30 नोव्हेंबरपर्यंत राजधानी दिल्लीत  7870 चेनस्नॅचिंगच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. पोलिसांच्या माहितीनुसार, यातील निम्मे म्हणजे, 4154 तक्रारींवर कारवाई करुन, गुन्हेगारांना गजाआड केलं आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: indias first secretary in united nations eenam gambhir became victim of snatching in delhi
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV