INDvsPAK : महामुकाबल्या दरम्यान शाहरुख आणि शेन वॉर्नमध्ये ट्विटरवर शाब्दिक युद्ध

INDvsPAK : महामुकाबल्या दरम्यान शाहरुख आणि शेन वॉर्नमध्ये ट्विटरवर शाब्दिक युद्ध

नवी दिल्ली : ओव्हल मैदानावर भारत आणि पाकिस्तानदरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीतला महामुकाबला सुरु आहे. या सामन्याचा आनंद लुटतानाच किंग खान शाहरुख खानने आपल्या सिनेमाला प्रमोट करत आहे. शाहरुखने आपल्या आगामी 'जब हॅरी मेट सेजल' सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी निळ्या जर्सीचा आधार घेतला होता. पण यावेळी शाहरुख आणि ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नमध्ये ट्विटरवर शाब्दिक युद्ध पाहायला मिळालं.सोशल मीडियावर आपल्या निळ्या जर्सीचा फोटो शेअर करुन शाहरुखने चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 च्या फायनलसाठी एक्साईट असल्याचं म्हणलं आहे. तसेच यावेळी 'जब हॅरी मेट सेजल'चं मिनी ट्रेलर रिलीज करणार असल्याचंही त्यानं सांगितलंय.

शाहरुखचं हे ट्वीट ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नने रिट्वीट करुन शुभेच्छा दिल्या आहेत. यावर शाहरुखने शेन वॉर्नचे आभार मानले आहेत. शाहरुखनं म्हणलंय की, "मित्रा आभारी आहे. तुला भेटून खूप वेळ झाला. सामना एन्जॉय कर."

शाहरुखला उत्तर देताना शेन वॉर्न म्हणतो की, "मी तुला लवकरच भेटेन. त्यावेळी एक चांगला खेळ होईल. इडन गार्डनवरील सामन्यात तू माझ्या फिरकीवर तडाखेबाज फलंदाजी केली होतीस, हे मला आजही आठवतंय."शाहरुखनं शेन वॉर्नच्या या ट्वीटला उत्तर देताना म्हणलंय की, "मी माझ्या स्वप्नांमध्येही तुला असेच फटकवेन... हा हा.."
सध्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामना चांगलाच रंगात आला आहे. या सामन्यात शाहरुख टीम इंडियाला चिअर अप करत आहे. यावेळीच त्याने आपल्या आगामी सिनेमाचं मिनी ट्रेलर रिलीज केलं आहे.
इंस्टाग्रामवरु जब हॅरी मेट सेजलचं मिनी ट्रेलर रिलीज करताना शाहरुख म्हणतो की, "सेजल मी आधीच सांगितलं होतं की, मी थोडा चीप आहे. आणि उद्या काहीतरी वेगळं सांगेन."

Herry! Tum mujhe daraane ke liye kya kya kehte ho @iamsrk @redchilliesent #JHMSMiniTrail1

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) onदरम्यान, अनुष्का शर्मानेही या सिनेमाचं मिनी ट्रेलर आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलं आहे. "हॅरी तू मला घाबरवण्यासाठी काय काय सांगतोस."

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV