आंतरराष्ट्रीय बॉक्सरची गोळ्या झाडून हत्या, गर्लफ्रेंडला अटक

बॉक्सरकडून होणाऱ्या ब्लॅकमेलिंगला वैतागून तरुणींनी त्याची हत्या केल्याचं चौकशीत उघड झालं आहे.

आंतरराष्ट्रीय बॉक्सरची गोळ्या झाडून हत्या, गर्लफ्रेंडला अटक

ग्रेटर नोएडा : आंतरराष्ट्रीय बॉक्सर जितेंद्र मान याच्या हत्येचा छडा लावण्यात अखेर पोलिसांना यश आलं आहे. ग्रोटर नोएडातील सूरजपूर पोलिसांनी एका तरुणीसह तीन जणांना अटक केली आहे. बॉक्सरकडून होणाऱ्या ब्लॅकमेलिंगला वैतागून तरुणींनी त्याची हत्या केल्याचं चौकशीत उघड झालं आहे.

सुरुजपूरमधील एवीजे हाईटमधील सोसायटीत राहणाऱ्या बॉक्सर जितेंद्र मानची 10 जानेवारीला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल 4 दिवसांनी म्हणजे 14 जानेवारीला पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. याप्रकरणी चौकशीदरम्यान पोलिसांनी याच सोसायटी समोर राहणाऱ्या सृष्टी गुप्ता या तरुणीला अटक केली. त्यानंतर ही संपूर्ण घटना उघडकीस आली.

चौकशीदरम्यान तरुणीनं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. जितेंद्र मान हा गेल्या काही महिन्यांपासून सृष्टीला जिमचं प्रशिक्षण देत होता. याच दरम्यान, त्यांचे शारीरिक संबंध जुळले. एके दिवशी मानने तिचा एक MMS बनवला आणि  तिला ब्लॅकमेल करु लागला. अशी माहिती पोलिसांनी दिली.

या सर्व प्रकारामुळे सृष्टीने जितेंद्र मानला संपवण्यासाठी बुलंदशहरमधील आपल्या इम्रान नावाच्या मित्राची मदत घेतली. तिने त्याच्याकडून एक पिस्तुल मिळवलं. घटनेच्या दिवशी सृष्टी जितेंद्रच्या घरी गेली आणि तिने त्याला एमएमएस डिलीट करण्यास सांगितलं. पण त्याने तिला जुमानलं नाही. याच वेळी तिने जितेंद्रवर अंदाधुंद गोळीबार केला आणि त्यातच त्याच्या मृत्यू झाला.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी सृष्टी गुप्ता, इम्रान आणि नफीस यांना अटक केली असून सध्या त्यांची कसून चौकशी सुरु आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: International Boxer’s murder girlfriend arrested latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV