जबरदस्तीने ओरल सेक्स म्हणजे बलात्कार? हायकोर्ट निकाल देणार!

विवाहित असल्याने माझ्यावर लैंगिक शोषण आणि बलात्काराचे आरोप लावले जाऊ शकत नाहीत, असा दावा त्याने केला आहे.

जबरदस्तीने ओरल सेक्स म्हणजे बलात्कार? हायकोर्ट निकाल देणार!

अहमदनगर : ओरल सेक्ससाठी पत्नीवर दबाव टाकणं बलात्कार आणि मानसिक क्रूरतेच्या श्रेणीत येतं का? यावर गुजरात उच्च न्यायालय आज निकाल देणार आहे. याशिवाय याअंतर्गत पतीला आरोपी बनवून खटला चालवला जाऊ शकतो की नाही, यावरही हायकोर्ट निर्णय देणार आहे.

न्यायमूर्ती जे बी परडीवाला यांनी या प्रकरणी सोमवारी राज्य सरकारकडून उत्तर मागितलं. तसंच ओरल सेक्ससाठी दबाव टाकल्याने पतीविरोधात साबरकांठामध्ये गुन्हा दाखल केलेल्या महिलेलाही हायकोर्टाने नोटीस पाठवली आहे.

यानंतर महिलेच्या पतीने हायकोर्टात दाद मागून आपल्यावरील बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे आरोप हटवण्याची मागणी केली आहे. विवाहित असल्याने माझ्यावर लैंगिक शोषण आणि बलात्काराचे आरोप लावले जाऊ शकत नाहीत, असा दावा त्याने केला आहे.

मॅरिटल रेपसारख्या गंभीर मुद्द्यावर बोलताना न्यायमूर्ती परडीवाला म्हणाले की, "भारतात मॅरिटल रेप अस्तित्त्वात आहे. हा एक घृणास्पद अपराध आहे, ज्यामुळे लग्नव्यवस्थेवरील विश्वासाला तडा गेला आहे. मोठ्या प्रमाणात महिला मॅरिटल रेपसारखं क्रूरकृत्य सहन करत आहेत."

गुजरात हायकोर्टाने अनेक मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागितलं आहे. भारतीय दंडविधान कलम 377 अंतर्गत एखादी पत्नी अनैसर्गिक सेक्ससंदर्भात पतीविरोधात खटला दाखल करु शकते का? जर पती आपल्या पत्नीवर ओरल सेक्ससाठी दबाव टाकत असेल तर ते आयपीसीच्या कलम 498 (अ) अंतर्गत क्रूरतेच्या श्रेणीत येतं का?

तसंच संमतीशिवाय पत्नीसोबत ओरल सेक्स करणं कलम 376 (बलात्कार) अंतर्गत दोषी मानता येईल का? याशिवाय मॅरिटल रेपच्या परिभाषेवरही विचार करायला हवा, असंही न्यायालयाने म्हटलं आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Is oral sex rape or marital cruelty? Gujarat High Court to decide
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV