लालू प्रसाद यादव यांच्या 22 ठिकाणांवर आयकर विभागाचा छापा

लालू प्रसाद यादव यांच्या 22 ठिकाणांवर आयकर विभागाचा छापा

नवी दिल्ली : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या 22 ठिकाणांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. आयकर विभाग आज सकाळी 8.30 च्या पासून कारवाई करत आहे.

एक हजार कोटींच्या बेनामी संपत्ती प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. आयकर विभागाने दिल्ली आणि गुडगावमधील 22 ठिकाणी छापे टाकले आहेत.

लालू प्रसाद यादव यांच्यासह खासदार प्रेमचंद गुप्ता यांच्या मुलांच्या घरावर छापा टाकण्यात आला आला.

सुशील मोदींचा लालू यादवांवर आरोप
लालू प्रसाद यादव यांच्यावर 1000 कोटी रुपयांची बेनामी जमिनीच्या व्यवहाराचा आरोप आहे. बिहारमधील भाजपचे जेष्ठ नेते सुशील कुमार मोदी यांनी लालू यादव आणि त्यांच्या कुटुंबियांवर हा आरोप केला होता. लालू यांच्या कुटुंबियाने दिल्लीत 115 कोटी रुपयांची अवैध संपत्ती आपल्या नावावर केल्याचा दावा सुशील कुमार मोदी यांनी केला होता.

दरम्यान, माजी अर्थमंत्री पी चिदंबरम आणि त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्या चेन्नईतील घरावर सीबीआयने आज छापा टाकला.

माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या घरावर सीबीआयचा छापा

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV