'आप'ला आयकर विभागाकडून 30 कोटी 67 लाखांची नोटीस

हे पैसे पक्षाकडून वसूल का करु नयेत, अशी विचारणा आयकर विभागाने केली आहे. तसंच विभागाने 7 डिसेंबरपर्यंत उत्तर मागितलं आहे.

'आप'ला आयकर विभागाकडून 30 कोटी 67 लाखांची नोटीस

नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला स्थापना दिवसाच्या एक दिवसानंतरच मोठा झटका बसला होता. पक्षाच्या देणगीमधील अनियमिततेमुळे आयकर विभागाने आपला 30 कोटी 67 लाख रुपयांची नोटीस पाठवली आहे.

हे पैसे पक्षाकडून वसूल का करु नयेत, अशी विचारणा आयकर विभागाने केली आहे. तसंच विभागाने 7 डिसेंबरपर्यंत उत्तर मागितलं आहे.

आयकर विभागाने म्हटलं आहे की, "निवडणूक आयोगाला दिलेला पहिला ऑडिट रिपोर्ट चुकीचा आणि जाणीवपूर्वक तयार केलेला आहे."

आम आदमी पक्षाने कालच (26 नोव्हेंबर) स्थापनेचे पाच वर्ष पूर्ण केले आहेत आणि या निमित्ताने दिल्लीच्या रामलीला मैदानावर मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र पुढच्याच दिवशी पक्षावर भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे.

मोदी सरकारने सूड म्हणून ही कारवाई केली आहे. राजकीय पक्षाची देणगी करपात्र उत्पन्न समजण्याची ही देशाच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे, असं आम आदमी पक्षाचा दावा आहे.

आम्ही या नोटीसला घाबरणार नाही आणि त्याविरोधात कायदेशीर सल्ला घेऊ. आम आदमी पक्ष एक एक पैशाचा हिशेब ठेवतो, असं आपच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: IT department sends Rs 30.67 crore notice to Aam Aadmi Party
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV