जम्मूतील सुंजवाँ कॅम्प ऑपरेशन संपलं, पाच जवान शहीद

रउफ असगर या हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. मौलाना जैशचा म्होरक्या मसूद अजहरचा तो भाऊ आहे.

जम्मूतील सुंजवाँ कॅम्प ऑपरेशन संपलं, पाच जवान शहीद

श्रीनगर : जम्मूच्या सुंजवाँमध्ये सैन्याच्या कॅम्पमध्ये सुरु असलेलं ऑपरेशन 30 तासांनी संपलं आहे. चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. चकमकीत पाच जवान शहीद झाले असून एका जवानाचे वडीलही हल्ल्यात मृत्युमुखी पडले आहेत.

दहशतावादी हल्ल्यात 9 जण जखमी झाले असून त्यामध्ये दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. काल (शनिवारी) पहाटे पाच वाजता दहशतवाद्यांनी सुंजवाँच्या आर्मी कॅम्पवर हल्ला केला होता. जवानांचं कुटुंबीय राहत असलेल्या भागाला दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं.

सुंजवाँ कॅम्प हल्ला, दोन जवान शहीद, तीन दहशतवाद्यांचा खात्मा


जैश-ए-मोहम्मदचे तीन अतिरेकी पहाटेच्या सुमारास ज्युनियर ऑफिसर्स राहत असलेल्या परिसरात घुसले आणि त्यांनी तिथं अंदाधुंद गोळीबार सुरु केला. त्यामुळे लष्करी जवानांच्या कुटुंबांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं होतं.

सुंजावाँ ब्रिगेड परिसर या लष्करी तळामध्ये तब्बल 3 हजार जवान आहेत. दहशतवादी हल्ल्यानंतर 150 घरं रिकामी करण्यात आली.

रउफ असगर या हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. मौलाना जैशचा म्होरक्या मसूद अजहरचा तो भाऊ आहे.

अफजल गुरुला फाशी दिल्याच्या घटनेला 9 फेब्रुवारीला 5 वर्ष पूर्ण झाली. त्यामुळे असा हल्ला होऊ शकतो याची सूचना गुप्तचर यंत्रणेनं दिली होती.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: jammu army camp attack five soldiers martyredd as jem militants storm into sunjuwan base
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV