भारतात लवकरच बुलेट ट्रेन धावणार, जपानसोबत करार

Japan inks pact to build India’s first bullet train

नवी दिल्ली : भारत आणि जपानमध्ये बुलेट ट्रेनबाबत महत्त्वपूर्ण करार झाला आहे. हैदराबाद हाऊसमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यात आज या महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षरी झाली.

 

भारतातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर धावणार आहे. 500 किलोमीटर लांबीच्या मुंबई-अहमदाबाद मार्गावर ताशी 300 किमीच्या वेगाने बुलेट ट्रेन धावणार अशी योजना आहे. जपानने बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासाठी 90 हजार कोटी रुपयांचं कर्ज देण्याची ऑफर दिली आहे. जपानची एजन्सी जीकानुसार, मुंबई-अहमदाबाद या मार्गावरील बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासाठी 98 हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे.

 

मुंबई-अहमदाबाद मार्गावर 2024 पर्यंत बुलेट ट्रेन सुरु करण्याचं उद्देश आहे. सध्या मुंबईहून अहमदाबादला जाण्यासाठी सात तास लागतात, मात्र बुलेट ट्रेनमुळे मुंबई-अहमदाबाद हे अंतर केवळ दोन तासांत कापता येणार आहे.

 

या करारामुळे भारतीय रेल्वेमध्ये क्रांती घडेल, असं विश्वास पंतप्रधान मोदींनी बोलून दाखवला. त्याचसोबत मार्च, 2016 पासून जपानचे नागरिक भारतात आल्यास त्यांना व्हिजा ऑन अरायव्हलची सुविधा मिळणार आहे.

 

बुलेट ट्रेनसोबतच दोन्ही देशात इतरही महत्त्वपूर्ण करार झाले होते. जपान आणि भारतात अणु वीजेवरही करार झाला आहे.

India News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Japan inks pact to build India’s first bullet train
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

आपल्या मराठी गुरुबद्दल उद्या काय बोलणार पंतप्रधान नरेंद्र मोदी?
आपल्या मराठी गुरुबद्दल उद्या काय बोलणार पंतप्रधान नरेंद्र मोदी?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर ज्या व्यक्तीचा

गोव्यातील धरणे फुल्ल, पावसाची बॅटिंग सुरुच
गोव्यातील धरणे फुल्ल, पावसाची बॅटिंग सुरुच

गोवा : गेल्या पाच दिवसांपासून पावसाने सुरु केलेले धूमशान काही

‘त्या’ जैन दाम्पत्याविरोधात मानवाधिकार आयोगाकडे तक्रार
‘त्या’ जैन दाम्पत्याविरोधात मानवाधिकार आयोगाकडे तक्रार

नीमच : कोट्यवधीच्या संपत्तीसह तीन वर्षांच्या मुलीचा त्याग करुन

योगी सरकारकडून सहा महिन्यांचं रिपोर्ट कार्ड सादर
योगी सरकारकडून सहा महिन्यांचं रिपोर्ट कार्ड सादर

लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या

एमबीबीएसला प्रवेश न मिळाल्याने 25 वर्षीय विवाहितेची हत्या?
एमबीबीएसला प्रवेश न मिळाल्याने 25 वर्षीय विवाहितेची हत्या?

हैदराबाद : एमबीबीएसला प्रवेश न मिळाल्याने 25 वर्षीय विवाहितेची पती

साडी वाटताना राडा, डिझाईन न आवडल्याने महिला आपसात भिडल्या
साडी वाटताना राडा, डिझाईन न आवडल्याने महिला आपसात भिडल्या

हैदराबाद : साडी म्हणजे तमाम महिलावर्गाचा वीकपॉईन्ट. साडी खरेदीच

दिवाळीपर्यंत पेट्रोल-डिझेलचे भाव उतरतील : पेट्रोलियम मंत्री
दिवाळीपर्यंत पेट्रोल-डिझेलचे भाव उतरतील : पेट्रोलियम मंत्री

चंदिगढ : येत्या दिवाळीपर्यंत पेट्रोल-डिझेलचे दर उतरतील, असं वक्तव्य

हनीप्रीत नेपाळच्या बिराटनगरमध्ये लपलेली, सुत्रांची माहिती
हनीप्रीत नेपाळच्या बिराटनगरमध्ये लपलेली, सुत्रांची माहिती

काठमांडू (नेपाळ) : बाबा राम रहीमच्या सर्वात जवळची व्यक्ती समजली

रोहिंग्यांना ट्रेनिंग देण्यासाठी आलेला अल-कायदाच्या दहशतवाद्याला अटक
रोहिंग्यांना ट्रेनिंग देण्यासाठी आलेला अल-कायदाच्या...

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी अल-कायदाच्या दहशतवाद्याला अटक केली