हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी जयराम ठाकूर यांची वर्णी

हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी जयराम ठाकूर यांची वर्णी लागणार आहे. आमदारांच्या बैठकीत आज हा निर्णय झाला आहे. याची औपचारिक घोषणा करण्यात आज बैठकीनंतर आली आहे.

हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी जयराम ठाकूर यांची वर्णी

शिमला : हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी जयराम ठाकूर यांची वर्णी लागणार आहे. आमदारांच्या बैठकीत आज हा निर्णय झाला आहे. याची औपचारिक घोषणा करण्यात आज बैठकीनंतर आली आहे.

आज मुख्यमंत्रीपदासाठी हिमाचल प्रदेशमध्ये आमदारांची बैठक झाली. या बैठकीला कोअर कमिटीचे सदस्यही उपस्थित होते. तसंच भाजपचे खासदारही उपस्थित होते. या बैठकीवेळी जयराम ठाकूर यांचं नाव सुचवण्यात आलं आणि त्यावरच सर्वांचं एकमत झालं.

जयराम ठाकूर हे याआधी चारवेळा विधानसभेत निवडून आले आहेत. सलग पाचव्यांदा विधानसभा जिंकत मुख्यमंत्रीपदी जयराम ठाकूर यांनी नाव कोरलं आहे. हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत प्रेमकुमार धुमल यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भाजपनं घोषित केलं होतं, मात्र धुमल निवडणुकीत पराभूत झाल्यामुळे जयराम ठाकूर यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे.

जयराम ठाकूर याआधी प्रेमकुमार धुमल यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदी राहिले आहेत. तसंच 2007 ते 2009 दरम्यान हिमाचल प्रदेशचे भाजप प्रदेशाध्यक्षपदीही त्यांनी काम पाहिलं आहे. जयराम ठाकूर हे सर्वात अनुभवी आमदार असल्यानं त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदीची माळ घातली आहे.

दरम्यान प्रेमकुमार धुमल यांच्या पराभवानंतर जे पी नड्डा यांचंही नाव मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत होतं. मात्र ते केंद्रीय मंत्री असल्याने तसंच राज्यात त्यांच्यासाठी पुरेसं अनुकुल वातावरण नसल्याने जयराम ठाकूर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: jayram thakur will be the next cm of himachal pradesh latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV