आमदारांकडून चुंबन स्पर्धेचं आयोजन, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वाद

झारखंडची राजधानी रांचीपासून सुमारे 400 किमी अंतरावर असलेल्या संथाल परगनातील झुमरिया गावात जत्रेदरम्यान काल रात्री आयोजित केलेल्या चुंबन स्पर्धेचा व्हिडीओ आज सोशल मीडियावर व्हायरल झाला.

आमदारांकडून चुंबन स्पर्धेचं आयोजन, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वाद

रांची : झारखंडच्या पाकुड जिल्ह्यात पारंपरिक ग्रामीण जत्रेदरम्यान आदिवासी दाम्पत्यासाठी चुंबन प्रतिक्रिया आयोजित केल्याने झारखंड मुक्ती मोर्चाच्या दोन आमदार अडचणीत आले आहेत. सत्ताधारी भाजपने दोन्ही आमदारांच्या निलंबनाची मागणी केली आहे.

झारखंड मुक्ती मोर्चाचे आमदार सायमन मरांडी म्हणाले की, आदिवासी समाजात वाढत्या घटस्फोटाच्या संख्येला आळा घालण्यासाठी ही चुंबन स्पर्धा आयोजित केली होती. सायमन मरांडी हे संथाल परगनातील लिट्टीपार मतदारसंघाचे आमदार आहेत. या जत्रेत पक्षाचे आमदार स्टीफन मरांडीही उपस्थित होते.

झारखंडची राजधानी रांचीपासून सुमारे 400 किमी अंतरावर असलेल्या संथाल परगनातील झुमरिया गावात जत्रेदरम्यान काल रात्री आयोजित केलेल्या चुंबन स्पर्धेचा व्हिडीओ आज सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये अनेक आदिवासी दाम्पत्य चुंबन घेत असल्याचं दिसत असून तिथे उपस्थित लोक टाळ्या वाजवताना दिसत आहेत.

झारखंडमधील भाजपचे उपाध्यक्ष हेमलाल मुर्मू यांनी या प्रकरणी सायमन आणि स्टीफन यांना विधानसभेतून निलंबित करण्याची मागणी केली आहे. "जेएमएमचे आमदार सायमन मरांडी आणि स्टीफन मरांडी यांनी 'हुल मेला' च्या नावावर चुंबन स्पर्धा आयोजित करुन संथाल परगनाच्या संस्कृतीचा अपमान केला आहे. सभागृहातून त्यांचं निलंबन व्हावं, हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजात त्यांना सहभागी होऊ देऊ नये," अशी आमची मागणी असल्याचं हेमलाल मुर्मू यांनी सांगितलं.

संथल परगनाची संस्कृती अशी नसून हा नारीशक्तीचा अपमान आहे. संथल परगनामध्ये मुलगा आणि मुलगी हातही मिळवत नाहीत. त्यामुळे दोन्ही आमदारांनी माफी मागवी, अशीही मागणी हेमलाल मुर्मू यांनी केली आहे.

दुसरीकडे स्पर्धेबाबत विचारलं असता सायमन मरांडी यांनी सांगितलं की, "विवाहित दाम्पत्यामधील नातं अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने 20 दाम्पत्यांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. संथल समाजाला समजण्याचा प्रयत्न कोणीही करत नाही. वाढत्या घटस्फोटाच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं."

झारखंडचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे नेते नीलकंठ सिंह मुंडा यांनी हा आदिवासी समाजाचा अपमान असल्याचं म्हटलं आहे. विजेत्यांना पुरस्कार दिल्याने निलकंठ सिंह मुंडा यांनी सायमन मरांडी यांच्यावर टीकाही केली.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Jharkhand: Kissing contest organized for married couples at a Mela in Dumaria village of Pakur
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV