जेएनयूत पुन्हा लाल झेंडा, ABVP चा दारुण पराभव

AISA च्या गीता कुमारी आणि सिमोन झोया यांनी अनुक्रमे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. तर SFI च्या दुग्गिराला श्रीकृष्ण हिची सचिवपदी आणि शुभांशु सिंग याची सहसचिव पदी निवड झाली.

जेएनयूत पुन्हा लाल झेंडा, ABVP चा दारुण पराभव

नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात जेएनयूमध्ये झालेल्या विद्यार्थी युनियनच्या निवडणुकीत पुन्हा लाल झेंडा फडकला. या निवडणुकीत पुन्हा एकदा डाव्या आघाडीच्या पॅनलने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थी संघटना अभाविपवर सहज विजय मिळवला. विद्यार्थी युनियनच्या अध्यक्षपदासाठी युनायटेड लेफ्ट आणि अभाविप यांच्यात मोठी चुरस होती.

AISA, SFI आणि DSF या तीनही डाव्या संघटनांनी यावर्षी एकत्र निवडणूक लढवली होती. यावेळी AISA च्या गीता कुमारी आणि सिमोन झोया यांनी अनुक्रमे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. तर SFI च्या दुग्गिराला श्रीकृष्ण हिची सचिवपदी आणि शुभांशु सिंग याची सहसचिव पदी निवड झाली.

AISA च्या गीता कुमारीने 464 मतांच्या अंतराने विजय मिळवला. तिला 1506 तर अभाविपच्या निधी त्रिपाठीला 1042 मतांवर समाधान मानावं लागलं. गीता एम.फिलची विद्यार्थीनी आहे.

काँग्रेसची विद्यार्थी संघटना NSUI ची कामगिरी या निवडणुकीत अत्यंत निराशाजनक होती. कारण NSUI च्या उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मतं मिळाली. अध्यक्षपदावर तिन्हीही मुख्य संघटनांनी विजय मिळवल्यानंतर चौथ्या स्थानावर अपक्ष उमेदवार फारुख आलम राहिला. त्याने वाद-विवाद भाषणामध्ये सर्व संघटनांच्या उमेदवारांवर मात केली.

दरम्यान आमचा सामना करण्यासाठी तीन संघटनांना एकत्र यावं लागलं. निकालावरुन हे स्पष्ट होतं की अभाविप जेएनयूतील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना आहे, असं अभाविपने म्हटलं आहे. या निकालाचा परिणाम दिल्ली विद्यापीठ निवडणुकीतही दिसण्याची शक्यता आहे. कारण तिथे अभाविपसमोर NSUI चं आव्हान असेल.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: abvp JNU election left union जेएनयू
First Published:
LiveTV