‘दाऊदच्या संपत्तीच्या लिलावात त्याच्याच हस्तकांची घुसखोरी’

यापूर्वीही दाऊदच्या संपत्तीचा लिलाव करण्याचा प्रयत्न झाला होता. पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता दुसऱ्यांदा जाहिरात काढण्यात आली आहे.

‘दाऊदच्या संपत्तीच्या लिलावात त्याच्याच हस्तकांची घुसखोरी’

मुंबई : भारताचा सर्वात मोठा शत्रू दाऊद इब्राहिम भोवतीचा फास घट्ट आवळण्यासाठी, केंद्र सरकारनं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. दाऊदच्या मुंबई, औरंगाबाद आणि दिल्ल्तील्या संपत्तीचा लिलाव करण्यात येणार आहे. मात्र, या लिलावात दाऊदच्या हस्तकांचीच घुसखोरी सुरु असल्याचा गंभीर आरोप पत्रकार बालकृष्णन यांनी केला आहे.

परदेशी विनिमय नियंत्रकांनी या लिलावासंदर्भात वर्तमानपत्रात जाहिरात दिली. 14 नोव्हेंबर 2017 ला दाऊदच्या संपत्तींचा लिलाव होणार आहे. या लिलावासाठी 5 कोटी 54 लाखांची मूळ किंमत ठेवण्यात आली आहे.

यापूर्वीही दाऊदच्या संपत्तीचा लिलाव करण्याचा प्रयत्न झाला होता. पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता दुसऱ्यांदा जाहिरात काढण्यात आली आहे. दरम्यान, केंद्र सरकारनं दाऊदच्या दुबईतल्या आणि लंडनमधल्या संपत्तीवर याआधीच टाच आणली आहे.

या लिलावामध्ये भेंडी बाजार परिसरातील दमरवाला इमारतीचा समावेश आहे. या इमारतीत दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर राहतो. दुबईला जाण्यापूर्वी दाऊद याच परिसरात राहत असे. दाऊदची आई अमिना बी यांनी ही इमारत 1980 मध्ये विकत घेतली होती.

याशिवाय मोहम्मद अली रोडवरील शबनम गेस्ट हाऊस, माझगावातील पर्ल हार्बर इमारतीतील एक फ्लॅट, सैफी ज्युबिली स्ट्रीटवरील दादरीवाला चाळीतील एका खोलीचे भाडेकरार अधिकार आणि औरंगाबादमधील 600 चौरस फूट फॅक्टरीचा प्लॉट या मालमत्तांचा लिलाव होईल.

याआधी, पत्रकार एस बालकृष्णन यांचा एनजीओ ‘देश सेवा समिती’ने हॉटेल रौनक अफरोझसाठी 4.28 कोटी रुपयांची सर्वाधिक किमतीची बोली लावली होती. 30 लाखांची अनामत रक्कम भरल्यानंतर 30 दिवसांच्या कालावधीत उर्वरित 3.98 कोटींची रक्कम भरता न आल्यामुळे ती मालमत्ता त्यांच्या हातून निसटली.

यावेळी हॉटेल रौनक अफरोझसाठी अनामत रक्कम 6.28 लाखांनी घटवून 23.72 लाख रुपये करण्यात आली आहे. या मालमत्तेची बाजारातील किंमत 6 ते 8 कोटींच्या घरात असल्याची माहिती आहे.

संबंधित बातम्या :

दाऊदच्या सहा मालमत्तांचा केंद्राकडून लिलाव होणार




भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV