'कमल हसनसारख्यांना भर चौकात गोळी मारुन फासावर लटकवा'

वादग्रस्त लेखानंतर कमल हसन वादाच्या केंद्रस्थानी आला आहे.

'कमल हसनसारख्यांना भर चौकात गोळी मारुन फासावर लटकवा'

नवी दिल्ली: अभिनेता कमल हसनच्या वादग्रस्त लेखानंतर, हिंदुत्वावादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. कमल हसनला भर चौकात गोळी मारायला हवी, अशी तीव प्रतिक्रिया अखिल भारतीय हिंदूमहासभेचा उपाध्यक्ष अशोक शर्मा यांनी दिली.

दाक्षिणात्य अभिनेता आणि राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारी असलेल्या कमल हसनचा नुकताच तामिळ भाषिक साप्ताहिक आनंदा विकटनमध्ये एक लेख प्रकाशित झाला. या लेखात त्याने उजव्या विचारसरणीच्या संघटनांमध्ये दहशतवाद बोकाळत असल्याचं म्हटलं होतं.

या लेखानंतर कमल हसन वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. वादग्रस्त लेखाप्रकरणी कमल हसनविरोधात वाराणसीत जनहित याचिकाही दाखल करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या शिवपूरमधील वकील कमलेश चंद्र त्रिपाठी यांनी ही याचिका दाखल केली आहे.

kamal hassan

त्यानंतर आता अखिल भारतीय हिंदू महासभेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

अखिल भारतीय हिंदूमहासभेचा उपाध्यक्ष अशोक शर्मा म्हणाले, “कमल हसन आणि त्यांच्यासारख्या लोकांना आधी गोळी मारायला हवी त्यानंतर त्यांना फासावर लटकवायला हवं. त्याशिवाय ते धडा शिकणार नाहीत. जो कोणी हिंदू धर्माविरोधात अपशब्द वापरतो, त्याला या पवित्र धरतीवर राहण्याचा अधिकार नाही. अपशब्दांबद्दल त्यांना मृत्यूदंडाचीच शिक्षा द्यायला हवी”

कमल हसन नेमकं काय म्हणाला?

कमल हसनने तामिळ भाषिक साप्ताहिक आनंदा विकटनमध्ये लेख लिहिला आहे. या लेखात कमल हससने म्हटलंय की, “उजव्या विचारसरणीच्या लोकांनी बळाचा वापर करायला सुरुवात केली आहे. हे लोक हिंसाचारात सहभागी असून हिंदूत्ववादी संघटनांमध्ये दहशतवाद घुसला. त्यामुळे लोकांची ‘सत्यमेव जयते’वरील आस्था संपली आहे.”

संबंधित बातम्या

‘हिंदुत्ववादी संघटनांमध्ये दहशतवाद बोकाळतोय’, कमल हसनचा वादग्रस्त लेख

वादग्रस्त लेखाप्रकरणी अभिनेता कमल हसन विरोधात जनहित याचिका दाखल

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: kamal hassan should be shot daid, said hindu mahasabha
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV