'ओल्ड मंक' रमचे निर्माते कपिल मोहन यांचं निधन

कपिल मोहन हे लष्करातून निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी 'ओल्ड मंक'ची निर्मिती केली.

'ओल्ड मंक' रमचे निर्माते कपिल मोहन यांचं निधन

गाझियाबाद : अस्सल मद्यप्रेमींची मैफल 'ओल्ड मंक'च्या बाटलीशिवाय रंगत नाही. गेली अनेक वर्ष मद्यप्रेमींच्या आनंदाचं कारण ठरलेल्या 'ओल्ड मंक' या रमचे निर्माते कपिल मोहन यांचं निधन झालं.

6 जानेवारी रोजी त्यांनी वयाच्या 88 व्या वर्षी गाझियाबादमध्ये कपिल मोहन यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या वर्षभरापासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. शुक्रवारी कार्डिअॅक अरेस्टने त्यांचं निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी पुष्पा मोहन आहेत.

ते 'मोहन मीकिन लिमिटेड' या कंपनीचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालकही होते. या कंपनीतच त्यांनी 'ओल्ड मंक'सह इतर पेयं तयार केली होती. कपिल मोहन हे लष्करातून निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी 'ओल्ड मंक'ची निर्मिती केली.

जगात सर्वाधिक विकली जाणारी रम म्हणून 'ओल्ड मंक'ची ख्याती होती. 19 डिसेंबर 1954 रोजी 'ओल्ड मंक'च्या विक्रीला सुरुवात करण्यात आली होती. 2010 मध्ये कपिल मोहन यांना 'पद्मश्री'ने गौरवण्यात आलं होतं.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Kapil Mohan, the man who gave us Old Monk rum, passes away latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV