संजय लीला भन्साळीच्या आईवर सिनेमा काढणार, करणी सेनेची घोषणा

पद्मावतला विरोध करणाऱ्या करणी सेनेनं आता दिग्दर्शक संजय लिला भन्साली यांच्या आईवर चित्रपट काढणार असल्याचं म्हटलं आहे. करणी सेनेचे जयपूरचे जिल्हाध्यक्ष गोविंद सिंह खांगरोट यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे.

संजय लीला भन्साळीच्या आईवर सिनेमा काढणार, करणी सेनेची घोषणा

मुंबई : पद्मावतला विरोध करणाऱ्या करणी सेनेनं आता दिग्दर्शक संजय लिला भन्साली यांच्या आईवर चित्रपट काढणार असल्याचं म्हटलं आहे. करणी सेनेचे जयपूरचे जिल्हाध्यक्ष गोविंद सिंह खांगरोट यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे.

महत्वाची बाब म्हणजे भन्साळी यांच्या आईवरील चित्रपटाचं पटकथा लेखन सुरु झाल्याचंही त्यांनी सांगितलं. या चित्रपटाचं नाव ‘लीला की लीला’ असेल, अशी घोषणाच करणी सेनेनं करुन टाकली आहे. हा चित्रपट याचं वर्षी प्रदर्शित केला जाईल.

चित्रपटाचं चित्रिकरण राजस्थानमध्ये होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आधार घेत असल्याचही करणी सेनेनं म्हटलं आहे. दरम्यान, संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावत चित्रपट मोठ्या पोलिस बंदोबस्तात काल ठिकठिकाणी प्रदर्शित झाला आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: karni sena anounced movie on sanjay leela bhansalis mother latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV