जयपूरमध्ये दिग्दर्शक संजय लीला भन्साळींना मारहाण

By: | Last Updated: > Saturday, 28 January 2017 1:13 PM
Karni Sena Protesters attack on Sanjay Leela Bhansali in Jaipur

जयपूर : जयपूरमधील जयगडमध्ये सुरु असलेल्या ‘पद्मावती’ चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आली. राजपूत समाजाशी संबंधित करणी सेना या संघटनेने हा हल्ला केला.

 

चित्रीकरणादरम्यान पद्मावतीची भूमिका करणारी दीपिका आणि अल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेतील रणवीर सिंहवर काही दृश्यं चित्रित करण्यात येत होती. ही दृश्यं चुकीची असल्याचं सांगत करणी सेनेने त्याचा निषेध केला.

 

जयगड किल्ल्यात भन्साळी यांच्या सिनेमाचं शूटिंग सुरु असतानाच करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी तिथे येऊन निषेध केला.  त्यांनी सेटवरील सामानाचीही तोडफोड केली. तसंच संजय भन्साळी यांच्या थोबाडात मारली. दरम्यान, पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

 

Karni_Sena_Protest

 

राणी पद्मावती यांची प्रतिमा आणि इतिहास चुकीच्या पद्धतीने या सिनेमात दाखवण्याचा प्रयत्न केला जात असल्याने विरोध केल्याचं करणी सेनेकडून सांगण्यात येत आहे.

 

करणी सेनेने याआधीही हृतिक रोशन आणि ऐश्वर्या राय यांच्या ‘जोधा अकबर’ सिनेमालाही विरोध केला होता. करणी सेना स्वत:ला राजपूतांच्या हितांची रक्षक असल्याचं सांगते. करणी सेना राजस्थानमध्ये काम करते.

 

दरम्यान, राम गोपाल वर्मा, करण जोहर, श्रेया घोषाल यांच्यासह बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी संजय लीला भन्साळी यांच्यावरील हल्ल्याचा ट्विटरवरुन निषेध केला आहे.

 

 

 

India News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Karni Sena Protesters attack on Sanjay Leela Bhansali in Jaipur
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

बँकेचा व्यवहार फक्त कार्डने, चेकबुक लवकरच इतिहासजमा?
बँकेचा व्यवहार फक्त कार्डने, चेकबुक लवकरच इतिहासजमा?

नवी दिल्ली : डिजिटल इंडियाचा नारा देणारं मोदी सरकार लवकरच चेकबुकला

गुजरात विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढवणार
गुजरात विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढवणार

अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटपाची बोलणी

कारच्या तुलनेत दुचाकी अपघातात पाच पट जास्त मृत्यू
कारच्या तुलनेत दुचाकी अपघातात पाच पट जास्त मृत्यू

नवी दिल्ली : कार अपघातांच्या तुलनेत दुचाकी दुर्घटनेत मृत्यू पाच पट

डेंगूवर उपचार करताना चिमुकलीचा मृत्यू, बिल 18 लाख रुपये
डेंगूवर उपचार करताना चिमुकलीचा मृत्यू, बिल 18 लाख रुपये

गुरुग्राम : डेंगूवर उपचार करताना गुरुग्राम येथील फोर्टिस

काँग्रेसने यापूर्वी अनेकदा अधिवेशन लांबणीवर टाकलं, अरुण जेटलींचा पलटवार
काँग्रेसने यापूर्वी अनेकदा अधिवेशन लांबणीवर टाकलं, अरुण जेटलींचा...

राजकोट : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या हिवाळी

जीएसटी अर्ध्या रात्री लागू करता, मग अधिवेशन का लांबवलं? : सोनिया गांधी
जीएसटी अर्ध्या रात्री लागू करता, मग अधिवेशन का लांबवलं? : सोनिया...

नवी दिल्ली : देशात जीएसटी लागू करण्यासाठी मध्यरात्री पंतप्रधान

पोलिस स्टेशनमध्येच दारु पिऊन डीजे पार्टी, चार कर्मचारी निलंबित
पोलिस स्टेशनमध्येच दारु पिऊन डीजे पार्टी, चार कर्मचारी निलंबित

विदिशा (मध्य प्रदेश) : पोलिस स्टेशन प्रभारीची बदली रद्द झाल्याने

काँग्रेसमुक्त भारतासाठी राहुल अध्यक्ष होणं आवश्यक: योगी
काँग्रेसमुक्त भारतासाठी राहुल अध्यक्ष होणं आवश्यक: योगी

लखनऊ: काँग्रेसमुक्त भारतासाठी राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष

‘साबरमती के संत’ गाण्यामुळे शहिदांचा अपमान : विज
‘साबरमती के संत’ गाण्यामुळे शहिदांचा अपमान : विज

नवी दिल्ली : भाजपचे नेते आणि हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज हे

काँग्रेसच्या पहिल्या यादीनंतर पाटीदार-काँग्रेस कार्यकर्ते भिडले!
काँग्रेसच्या पहिल्या यादीनंतर पाटीदार-काँग्रेस कार्यकर्ते भिडले!

अहमदाबाद : गुजरातमध्ये काँग्रेसने 77 उमेदवारांची पहिली यादी जाहीर