दहशतवादाला 'किक' मारुन काश्मीरच्या फुटबॉलपटूचं आठवडाभरात समर्पण

माजिदचे कुटुंबीय आणि मित्रांनी त्याला शरण येण्यासाठी दबाव टाकला. त्याच्यासाठी सोशल मीडियाद्वारे काश्मीर खोऱ्यात मोठी मोहीम सुरु होती.

दहशतवादाला 'किक' मारुन काश्मीरच्या फुटबॉलपटूचं आठवडाभरात समर्पण

श्रीनगर : दहशतवादी संघटनेत सामील झालेला काश्मीरचा फुटबॉलपटू माजिद इरशाद खानने गुरुवारी रात्री 11.30 वाजता आत्मसमर्पण केलं. तीन दिवसांपूर्वी माजिद लष्कर-ए-तोयबा या संघटनेत सामील झाला होता. सध्या तो अवंतीपोरामध्ये व्हिक्टर फोर्सच्या ताब्यात आहे.

जिल्हास्तरीय फुटबॉलपटू असलेला माजिद मूळचा अनंतनागचा रहिवासी आहे. 20 वर्षीय फुटबॉलपटू माजिद इरशाद खान ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. त्याच्या या निर्णयामुळे कुटुंब, नातेवाईक आणि मित्रांच्या पायाखालून जमीनच सरकली होती.

माजिदचे कुटुंबीय आणि मित्रांनी त्याला शरण येण्यासाठी दबाव टाकला. त्याच्यासाठी सोशल मीडियाद्वारे काश्मीर खोऱ्यात मोठी मोहीम सुरु होती. अखेर त्याने स्वत:च दक्षिण काश्मीरचे पोलिस उपमहानिरीक्षकांसमोर आत्मसमर्पण केलं.

फेसबुक पोस्टमधून संकेत
माजीद इरशाद खानने 29 ऑक्टोबरला फेसबुक पोस्टद्वारे एका दहशतवादी संघटनेत सामील झाल्याचे संकेत दिले होते. 'शौक ए शहादत मनात असताना, फासावर लटकायला काय घाबरायचं,' असं त्याने फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं होतं. माजिद खान नववीपासून लोकल फुटबॉल क्लबचा सदस्य होता.

Footballer_Terrorist

एके-47 सोबतचा फोटो व्हायरल
अनंतनागच्या बॉईज डिग्री कॉलेजमध्ये पदवीचं शिक्षण घेणारा माजिद सादिकाबाद परिसरात राहतो. दहशतवादी संघटनेत सामील होण्याआधी माजिद एका सामाजिक संस्थेसोबत एक कार्यकर्ता म्हणून काम करत होता. या संस्थेत तो इमर्जन्सी हेड होता. मागील शुक्रवारी एके-47 सोबतचा माजिदचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. यानंतर हा युवा फुटबॉलपटू लष्कर-ए-तोयबामध्ये सामील झाल्याचं स्पष्ट झालं.

मित्राच्या अंत्यसंस्कारानंतर दहशतवादी संघटनेत
त्याचा मित्र यावर नासिर यंदाच्या जुलै महिन्यात हिजबुल मुजाहिद्दीनमध्ये सामील झाला होता. या संघटनेत सामील झाल्यानंतर केवळ 15 दिवसांतच म्हणजे 3 ऑगस्टला सुरक्षारक्षकांसोबतच्या चकमकीत त्याचा खात्मा झाला होता. माजिद यावरच्या अंत्यसंस्काराला गेला होता, त्यानंतर स्वत: लष्कर ए तोयबामध्ये सहभागी झाला.

आईची आर्त साद
सोशल मीडियावर सुरु असलेल्या मोहीमेच्या व्हिडीओत आई माजीदला परत येण्याचं आवाहन करत आहे. "परत ये आणि आमचा जीव घे, त्यानंतर निघून जा. कोणासाठी तू मला सोडून निघून गेलास?" अशी आर्त साद आई व्हिडीओमध्ये देत आहे.

मात्र आता माजिद परतल्याने कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Kashmir : Footballer who joined LeT recently, has surrendered before security forces
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV