उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ यांची वर्णी

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ यांची वर्णी

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची आज लखनऊमध्ये बैठक झाली. त्यामध्ये त्यांच्या नावार एकमत झालं. उद्या (19 मार्च) योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. याशिवाय दिनेश शर्मा आणि केशव प्रसाद मौर्य यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली जाणार आहे.

 

उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याबाबत बरेच तर्कवितर्क सुरु होते. अखेर आज योगी आदित्यनाथ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. आज सुरुवातीला मनोज सिन्हा, केशव मौर्य यांचं नाव आघाडीवर होतं. पण या दोघांना मागे टाकत योगी आदित्यनाथ यांनी शेवटच्या क्षणी बाजी मारली.

 

योगी आदित्यनाथ हे आज चार्टर्ड विमानं दिल्लीला रवाना झाले होते. त्यानंतर भाजपच्या आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्यात आला. दरम्यान, योगी आदित्यनाथ यांच्या नावाची घोषणा झाल्यानं अनेकांच्या भुवयाही उंचावल्या आहेत. कट्टर हिंदुत्ववादी अशी आजवर आदित्यनाथ यांची ओळख आहे. त्यामुळे विकासाच्या राजकारणासोबत भाजप या निमित्तानं हिंदुत्वाचा मुद्दा रेटण्याचा प्रयत्न करीत असल्याचीही जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

 
योगी आदित्यनाथ यांचा अल्प परिचय :

 

– महंत योगी आदित्यनाथ यांचा जन्म ५ जून १९७२ रोजी उत्तराखंडच्या गढवालमध्ये झाला. त्यांचं मुळ नाव अजय सिंह असं आहे.

 

– गढवाल विश्वविद्यालयातून त्यांनी बीएससीपर्यंतच शिक्षण पूर्ण केलं आहे.

 

– 1998 पासून ते गोरखपूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून येत आहेत.

 

– याशिवाय आदित्यनाथ हे गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिराचे प्रमुख महंत आहेत.

 

– ते दिवंगत खासदार व हिंदू महासभेचे अध्यक्ष महंत अवैद्यनाथ ह्यांचे वारसदार मानले जातात.

 

 

दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री असलेले राजनाथ सिंह यांना उत्तर प्रदेशमध्ये पाठवण्याची चर्चा सुरु होती. मात्र, राजनाथ सिंह यांनी ही शक्यता फेटाळून लावली होती.

 

पूर्व उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा सर्वात मोठा चेहरा असलेले योगी आदित्यनाथही मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार होते. उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या विजयात महत्वाची भूमिका निभावणारे केशव प्रसाद मौर्य यांच नावही चर्चेत होतं. मात्र पक्षानं अखेर योगी आदित्यनाथ यांच्या पारड्यात वजन टाकलं.

 

संबंधित बातम्या:

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाचा सस्पेंस संपणार?

 

इलेक्शन डायरी : गोरखपूरचं समांतर सरकार- योगी आदित्यनाथ

 

First Published: Saturday, 18 March 2017 5:31 PM

Related Stories

देवेंद्र फडणवीसांच्या पाच आयडिया योगी आदित्यनाथांनी मागवल्या
देवेंद्र फडणवीसांच्या पाच आयडिया योगी आदित्यनाथांनी मागवल्या

मुंबई : देशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशच्या

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 25/03/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 25/03/2017

फडणवीस सरकारचं एक पाऊल मागे, आमदारांचं निलंबन मागे घेणार, 29 मार्चला 12

पाटण्यात स्टेज कोसळल्याने लालू प्रसाद यादव जखमी
पाटण्यात स्टेज कोसळल्याने लालू प्रसाद यादव जखमी

पाटणा : पाटणामध्ये पुन्हा एकदा प्रचंड गर्दीमुळे स्टेज कोसळल्याची

मोबाईल कनेक्शनसाठी आता ई-केवायसी बंधनकारक
मोबाईल कनेक्शनसाठी आता ई-केवायसी बंधनकारक

मुंबई : नवीन मोबाईल कनेक्शन घेण्यासाठी आता आधारकार्ड सक्तीचं होणार

उद्धव ठाकरेंना मोदींकडून स्नेहभोजनाचं निमंत्रण
उद्धव ठाकरेंना मोदींकडून स्नेहभोजनाचं निमंत्रण

नवी दिल्ली : शिवसेना सातत्याने करत असलेला विरोध टाळण्यासाठी आता

विजय मल्ल्यांना भारतात आणण्याचा मार्ग मोकळा, प्रत्यार्पणाला मंजुरी
विजय मल्ल्यांना भारतात आणण्याचा मार्ग मोकळा, प्रत्यार्पणाला...

मुंबई : सरकारी बँकांचं कर्ज बुडवणाऱ्या विजय मल्ल्या यांच्या

सेबीचा रिलायन्स इंडस्ट्रीजला दणका, एक हजार कोटींचा दंड
सेबीचा रिलायन्स इंडस्ट्रीजला दणका, एक हजार कोटींचा दंड

नवी दिल्ली : सिक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबीने

मान्सूनवर अल निनोचा प्रभाव होणार नाही: हवामान खातं
मान्सूनवर अल निनोचा प्रभाव होणार नाही: हवामान खातं

मुंबई: भारतातल्या मान्सूनची अल निनोच्या कचाट्यातून सुटका झाल्याची

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 24/03/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 24/03/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/03/2017   पाच दिवसांनी डॉक्टरांचा संप

केंद्र सरकारकडून सूर्यफूल बियांच्या आयात शुल्कामध्ये 20 टक्के कपात
केंद्र सरकारकडून सूर्यफूल बियांच्या आयात शुल्कामध्ये 20 टक्के कपात

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सूर्यफूलाच्या बियांचे आयात शुल्क 30