दहशतवाद्यांची बिर्याणी पार्टी, व्हायरल व्हिडीओमागचं सत्य काय?

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Friday, 19 May 2017 1:30 PM
दहशतवाद्यांची बिर्याणी पार्टी, व्हायरल व्हिडीओमागचं सत्य काय?

नवी दिल्ली : एकीकडे दहशतवाद्यांना शोधण्यासाठी मोठं सर्च ऑपरेशन भारतीय सैन्याने हाती घेतलं आहे, तर दुसरीकडे दहशतवाद्यांच्या बिर्याणी पार्टीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. दहशतवादी जंगलात बसून अगदी आरामात बिर्याणीवर ताव मारताना या व्हिडीओत दिसतात.

आता प्रश्न असे उपस्थित होत आहेत की, व्हिडीओ जुना आहे की नवीन? आणि कोणत्या हेतूने हा व्हिडीओ व्हायरल केला गेलाय का?

व्हिडीओमध्ये काय दिसत आहे?

37 सेकंदांच्या या व्हिडीओच्या सुरुवातीला एक दहशतवादी आरामात बसून बिर्याणीवर ताव मारताना दिसत आहे, त्याच्या डोळ्यांवर काळा चष्मा आहे. व्हिडीओ थोडा पुढे गेल्यानंतर, दुसरा दहशतवादी बोटं चाटताना दिसतो. यांशिवाय आणखी दोन दहशतवादीही बिर्याणीवर ताव मारताना दिसतात.

टिफीनमध्ये खूप सारं मटन ठेवलेलं पाहायलं मिळतं. कोल्डड्रिंकच्या बाटल्याही दिसतात. चार दहशतवादी खाताना, तर पाचवा व्हिडीओ शूट करत आहे आणि सहावा इसम या पाचही जणांना कॅमेऱ्यात कैद करत आहे.

व्हिडीओमागचं सत्य काय?

एबीपी न्यूजने व्हायरल व्हिडीओमागचं सत्य जाणून घेण्यासाठी सैन्य दलातील सूत्रांशी संपर्क साधला. त्यानंतर अशी माहिती समोर आली की, हा व्हिडीओ दक्षिण काश्मीरमधील बागेतील आहे. काश्मीरच्या शोपियां-कुलगाम सीमेवरील हा परिसर आहे. हा व्हायरल व्हिडीओ लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांचा आहे.

दहशतवाद्यांना जेवण कुठून मिळतं?

दहशतवादी जी बिर्याणी पार्टी करत आहेत, ती बिर्याणी त्याच परिसरात राहणाऱ्या कुटंबाने दिली आहे. हे लोक दहशतवाद्यांसाठी ओव्हर ग्राऊंड वर्कर्स म्हणून काम करतात. म्हणजेच सर्वसाधारण काश्मिरी लोकांप्रमाणेच हे लोक राहतात. मात्र, दहशतवाद्यांना जेवण वगैरे बनवून देण्याचं काम करतात.

दहशतवाद्यांपर्यंत जेवण कसं पोहोचवलं जातं?

दहशतवाद्यांपर्यंत जेवण पोहोचवण्याची एक खास प्रक्रिया आहे. जेवण तयार झाल्यानंतर दहशतवादी अशा मुलांना मशिदीजवळ पाठवतात, जे दहशतवादी नाहीत. ही मुलं जेवण घेऊन दुसऱ्या मुलांकडे देतात. त्यानंतर ते दहशतवाद्यांपर्यंत पोहोचतं. पोलिस किंवा कोणतीही सुरक्षा यंत्रणा आपल्यापर्यंत पोहोचू नये म्हणून दहशतवादी अशाप्रकारे किचकट प्रक्रियेतून जेवण मागवतात.

सैन्याला घाबरुन जंगलात लपतात दहशतवादी!

जम्मू-काश्मीरमध्ये सैन्याने 15 वर्षांनंतर कॉर्डन एंड सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे. या ऑपरेशनच्या माध्यमातून प्रत्येक घर तपासलं जाणार आहे. जेणेकरुन दहशतवादी बंदुकीचा धाक दाखवून लपला असल्यास त्याला पकडता येईल.

सैन्य दलातील सूत्रांच्या माहितीनुसार, कॉर्डन एंड सर्च ऑपरेशन सुरु झाल्यानंतर दहशतवादी जंगलात पळाले असून, तिकडे लपले आहेत आणि तिथेच त्यांचं खाणं-पिणं होत आहे.

एबीपी न्यूजच्या पडताळणीत दहशतवाद्यांच्या कोल्डड्रिंक-बिर्याणीच्या पार्टीचा व्हिडीओ खरा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

First Published: Friday, 19 May 2017 1:23 PM

Related Stories

पश्चिम बंगालमध्ये डाव्यांचं आंदोलन, पोलिसांचा लाठीमार
पश्चिम बंगालमध्ये डाव्यांचं आंदोलन, पोलिसांचा लाठीमार

कोलकाता : पश्चिम बंगाल सरकारच्या कोलकातामधील मंत्रालयाबाहेर

'कपटी' संबोधल्याने केजरीवालांवर जेटलींकडून मानहानीचा खटला
'कपटी' संबोधल्याने केजरीवालांवर जेटलींकडून मानहानीचा खटला

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिल्लीचे

दगडफेक करणाऱ्यांऐवजी अरुंधती रॉय यांना जीपला बांधा : परेश रावल
दगडफेक करणाऱ्यांऐवजी अरुंधती रॉय यांना जीपला बांधा : परेश रावल

मुंबई : आपल्या विनोदी आणि दमदार अभिनयासाठी ओळखले जाणारे बॉलिवूड

महाराष्ट्र विधानसभेत GST विधेयक एकमताने मंजूर
महाराष्ट्र विधानसभेत GST विधेयक एकमताने मंजूर

मुंबई : महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विधेयक अर्थात जीएसटी विधानसभेत

केवळ साडे 8 तासात मुंबई-गोवा... हायटेक ‘तेजस’ सज्ज!
केवळ साडे 8 तासात मुंबई-गोवा... हायटेक ‘तेजस’ सज्ज!

मुंबई: मुंबई ते गोवा धावणारी ‘तेजस’ आजपासून (सोमवार) मुंबईतून

‘तिहेरी तलाक’वर शबाना आझमी म्हणतात...
‘तिहेरी तलाक’वर शबाना आझमी म्हणतात...

लुधियाना : हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी

पाकिस्तानात भारतीय नागरिकाला अटक, पासपोर्ट नसल्याचा दावा
पाकिस्तानात भारतीय नागरिकाला अटक, पासपोर्ट नसल्याचा दावा

इस्लामाबाद : कुलभूषण जाधव यांच्या फाशीला आंतरराष्ट्रीय कोर्टाने

... तर केंद्र सरकार कायद्याद्वारे तिहेरी तलाकवर बंदी घालेल : व्यंकय्या नायडू
... तर केंद्र सरकार कायद्याद्वारे तिहेरी तलाकवर बंदी घालेल :...

अमरावती : सध्या सुप्रीम कोर्टात तिहेरी तलाकवर सुनावणी सुरु आहे.

'तेजस'वर समाजकंटकांची वक्रदृष्टी, काचा फोडल्या
'तेजस'वर समाजकंटकांची वक्रदृष्टी, काचा फोडल्या

मुंबई : भारतीय रेल्वेचा वेग वाढवणारी सुपरफास्ट हायटेक ट्रेन तेजस

बद्रीनाथमधील भूस्खलनानंतर महामार्गावर वाहनांच्या 20 ते 30 किलोमीटर रांगा
बद्रीनाथमधील भूस्खलनानंतर महामार्गावर वाहनांच्या 20 ते 30 किलोमीटर...

देहरादून : बद्रीनाथमध्ये शुक्रवारी झालेल्या भूस्खलनानंतर आता