हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये भूस्खलनात दोन बस अडकल्या, 60 जणांचा मृत्यू

हिमाचल प्रदेशमध्ये शनिवारीमध्ये मंडी राष्ट्रीय महामार्गावर भूस्खलनात दोन बस दबल्या आहेत. यात 60 जणांचा मृत्यू झालाय, तर 45 जण बसमध्ये दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

By: | Last Updated: > Sunday, 13 August 2017 6:10 PM
landslide in mandi national highway sixty dead latest update

 

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशातील मंडी येथे भूस्खलन होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मातीच्या ढिगाऱ्याखाली दोन बस गाडल्या गेल्याने यातील 60 जणांचा मृत्यू झाला आहे.

भूस्खलनामुळे मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडलेल्या बसपैकी एक बस चंबा येथून मनाली येथे जात होती. तर दुसरी मनाली येथून कटरा येथे जात होती. या बस मंडी येथे आल्या असताना हा अपघात झाला.

हिमाचल प्रदेशमधील मंडी राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी रात्री भूस्खलन झालं. ज्यामध्ये 2 बस अडकल्या असून, एक बस 800 मीटरपर्यंत वाहून गेली आहे, शिवाय अनेक लोक जमिनीखाली गाडले गेले. या घटनेतील पाच जणांना वाचवण्याच यश आलं असून, त्यांच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

mandi-01

 

भूस्खलनात अडकलेल्या दोन्ही बस चहा-नाश्त्यासाठी एके हायवेलगत उरला- जोगिंद्रनगरजवळ कोटकरुपीमध्ये थांबल्या होत्या. त्यावेळी ही दुर्घटना घडली.

या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून, बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु आहे. या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने मंडी ते कुल्लूपर्यंतचा महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला आहे.

या घटनेनंतर प्रशासनाने हेल्पलाईनही सुरु केल्या आहेत. प्रशासनाने मदत कार्यासाठी 01905-226201,202,203 हे संपर्क क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तर परिवहन मंडळानेही दोन क्रमांक उपलब्ध करुन दिले आहेत. यात 01905235538 आणि मोबाईल क्रंमाक 9418001051 या नंबरवर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

India News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:landslide in mandi national highway sixty dead latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

सुरतमध्ये 70 ते 80 लाखांचं कर्ज फेडण्यासाठी बनावट नोटांची छपाई
सुरतमध्ये 70 ते 80 लाखांचं कर्ज फेडण्यासाठी बनावट नोटांची छपाई

सुरत : गुजरातमधील सुरतमध्ये बनावट नोटांचं रॅकेट पकडण्यात आले आहे.

'गोरखपूरमधल्या 36 मुलांच्या मृत्यूप्रकरणी कडक कारवाई करणार'
'गोरखपूरमधल्या 36 मुलांच्या मृत्यूप्रकरणी कडक कारवाई करणार'

गोरखपूर : गोरखपूरमधील 36 मुलांच्या मृत्यूप्रकरणातील दोषींवर कडक

दिल्लीत सरकारविरोधात हजारो रेल्वे अप्रेंटिसचं अर्धनग्न प्रदर्शन
दिल्लीत सरकारविरोधात हजारो रेल्वे अप्रेंटिसचं अर्धनग्न प्रदर्शन

नवी दिल्ली : रेल्वे अप्रेटिंसधारकरांनी पुन्हा एकदा दिल्लीच्या

काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!
काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला...

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात दहशतवाद्यांशी

'गोरखपूरमधील 36 मुलांचा मृत्यू ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे नाही'
'गोरखपूरमधील 36 मुलांचा मृत्यू ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे नाही'

नवी दिल्ली : गोरखपूरमधील 36 मुलांच्या मृत्यूसाठी ऑक्सिजनची कमतरतेचं

शरद यादव यांना जेडीयूच्या राज्यसभा गट नेतेपदावरुन हटवलं!
शरद यादव यांना जेडीयूच्या राज्यसभा गट नेतेपदावरुन हटवलं!

नवी दिल्ली : बिहारच्या राजकारणात आणखी एक मोठी घडामोड घडली आहे. सतत

गोरखपूर दुर्घटना: मृतांचा आकडा 36 वर,ऑक्सिजन बंद केल्याने बालकांचा मृत्यू
गोरखपूर दुर्घटना: मृतांचा आकडा 36 वर,ऑक्सिजन बंद केल्याने बालकांचा...

लखनऊ: ऑक्सिजनचा पुरवठा बंद केल्यामुळं 36 बालकांचा मृत्यू झाल्याची

मुस्लिमांविषयीची वेदना नव्हे, सत्ता सुटल्याची व्यथा : 'सामना'
मुस्लिमांविषयीची वेदना नव्हे, सत्ता सुटल्याची व्यथा : 'सामना'

मुंबई : उपराष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपताना हमीद अन्सारी यांनी

डोकलाम वाद : सिक्कीम, अरुणाचल सीमेवर भारतानं सैन्य वाढवलं!
डोकलाम वाद : सिक्कीम, अरुणाचल सीमेवर भारतानं सैन्य वाढवलं!

नवी दिल्ली : डोकलाम वादाच्या पार्श्वभूमीवर भारतानं अधिकचं सैन्य

गोरखपूर: रुग्णालयातील ऑक्सिजनचा पुरवठा बंद केल्यानं 30 मुलांचा मृत्यू
गोरखपूर: रुग्णालयातील ऑक्सिजनचा पुरवठा बंद केल्यानं 30 मुलांचा...

गोरखपूर (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशमधील गोरखपूरमध्ये बीआरडी