कांची पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांना महासमाधी

कांची पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांच्या महासमाधीचा सोहळा आज (गुरुवार) पार पडला.

कांची पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांना महासमाधी

कांची (तामिळनाडू) : कांची पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांच्या महासमाधीचा सोहळा आज (गुरुवार) पार पडला. काल (बुधवार) चेन्नईमध्ये शंकराचार्यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं होतं. कांची मठामध्ये शंकराचार्यांना समाधी दिली जाणार आहे. त्याआधी मंत्रोच्चार करत त्यांच्यावर महाभिषेक केला गेला.

जयेंद्र सरस्वती हे कांची पीठाचे 69 वे शंकराचार्य होते. जयेंद्र सरस्वती यांच्या कार्यकाळात कांची कामकोठी पीठाचं काम मोठ्या प्रमाणात विस्तारलं. त्यांच्या कार्यकाळात अनेक रुग्णालये, शाळा उभारल्या गेल्या. अयोध्या रामजन्मभूमी वाद चर्चेतून सोडवण्यासाठी त्यांनी मध्यस्ती करण्याचाही प्रयत्न केला होता.

दरम्यान, जयेंद्र सरस्वतींच्या निधनानंतर आता कांची मठात विजयेंद्र सरस्वती यांची शंकराचार्य म्हणून नियुक्ती करण्यात येणार असून ते कांची पीठाचे 70वे
शंकराचार्य असतील.

चंद्रशेखरेंद्र सरस्वती यांनी 1954 साली त्यांना शंकराचार्य म्हणून आपलं उत्तराधिकारी नेमलं होतं. त्यानंतर ते 1983 साली जयेंद्र सरस्वती यांनी शंकर विजयेंद्र सरस्वती यांची आपला उत्तराधिकारी म्हणून घोषणा केली होती.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: last ritual performed on shankaracharya jayendra saraswathi latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV