LIVE - राष्ट्रपती निवडणूक: भुजबळ, कदम मतदानासाठी जेलबाहेर

LIVE - राष्ट्रपती निवडणूक: भुजबळ, कदम मतदानासाठी जेलबाहेर

नवी दिल्ली/मुंबई: देशाच्या 14 व्या राष्ट्रपतीपदासाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. थोड्याच वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी मतदान केलं.
भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही मतदान केलं.
राष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद आणि यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांच्यात थेट लढत आहे. मात्र पाठिंब्याचा विचार केला तर सध्या तरी कोविंद यांचं पारडं जड मानलं जात आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मुंबईतही आमदारांचं मतदान होत आहे. विशेष म्हणजे जेलमध्ये असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ आणि आमदार रमेश कदमही यांनाही मतदानाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळं हे दोघेही मतदान करतील.
1:10 PM17 July 2017
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदानाचा हक्क बजावला
1:07 PM17 July 2017
1:09 PM17 July 2017
11:45 AM17 July 2017
राष्ट्रपती निवडणूक : राष्ट्रवादीच्या सर्व खासदार आणि आमदारांचं मीरा कुमार यांना मतदान, प्रफुल्ल पटेल यांची माहिती
12:37 PM17 July 2017
जेलमध्ये असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ आणि रमेश कदम हे राष्ट्रपती निवडणुकीसाठी विधानभवनाकडे रवाना झाले. पोलीस बंदोबस्तात त्यांना मतदानासाठी नेण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादीचे अन्य नेतेही उपस्थित होते.
12:39 PM17 July 2017
11:19 AM17 July 2017
मुंबईतही राष्ट्रपतीपदाच्या मतदानाची लगबग पाहायला मिळतेय. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह अनेक आमदार आणि मंत्री मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विधानभवनात दाखल झाले. भाजपचे गिरीष महाजन, पंकजा मुंडे, विनोद तावडे, एकनाथ खडसे तर शिवसेनेचे सुनील प्रभू, निलम गोऱ्हे यांनी मतदानाचा हक्क बजावला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी मतदान केलं.
11:12 AM17 July 2017
11:11 AM17 July 2017
राष्ट्रपती निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी मतदान केलं.
11:10 AM17 July 2017
LiveTV