जैश ए मोहम्मदचा म्होरक्या खालिदचा 'लव्ह-सेक्स-धोक्या'मुळे खात्मा

वर्षभरापूर्वी संबंधित तरुणी प्रेग्नंट राहिली. ही गोष्ट तिने तेव्हाचा बॉयफ्रेण्ड आणि जैश ए मोहम्मदचा दहशतवादी खालिदला सांगितली. मात्र तिच्या चेहऱ्यावरचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर उमटलाच नाही.

जैश ए मोहम्मदचा म्होरक्या खालिदचा 'लव्ह-सेक्स-धोक्या'मुळे खात्मा

श्रीनगर : जैश ए मोहम्मदचा काश्मिरातील म्होरक्या खालिदला बारामुल्ला जिल्ह्यात झालेल्या चकमकीत कंठस्नान घालण्यात आलं. खालिदच्या खात्म्यामागे 'लव्ह सेक्स आणि धोका' असं कनेक्शन असल्याचं म्हटलं जातं. खालिदच्या एक्स गर्लफ्रेण्डने दिलेल्या टीपमुळे सुरक्षा यंत्रणा त्याच्यापर्यंत पोहचल्याचं 'इंडिया टुडे'च्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

गेल्या वर्षी विशीतली एक काश्मिरी तरुणी जम्मू आणि काश्मिर पोलिस अधिकाऱ्यांच्या कक्षात आली होती. 'मला खालिद मृतावस्थेत हवा आहे' असं तिने सांगितलं. 'मी तुम्हाला त्याचा माग काढून देईन, पुढचं तुम्ही बघून घ्या' असं तिने पोलिसांना सांगितलं. ही तरुणी म्हणजे खालिदची एक्स गर्लफ्रेण्ड

एक्स गर्लफ्रेण्ड जीवावर का उठली?

वर्षभरापूर्वी संबंधित तरुणी प्रेग्नंट राहिली. ही गोष्ट तिने तेव्हाचा बॉयफ्रेण्ड आणि जैश ए मोहम्मदचा दहशतवादी खालिदला सांगितली. मात्र तिच्या चेहऱ्यावरचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर उमटलाच नाही. 'मला तुझ्याशी किंवा तुझ्या गर्भातल्या बाळाशी काहीही देणंघेणं नाही' असं खालिदने तिला सांगितलं.

मानसिक धक्क्यात असलेली तरुणी बहिणीसोबत पंजाबमधील जालंदरला गेली. तिथे गुप्तपणे त्यांनी तिचा गर्भपात केला. मात्र तरुणीच्या मनातली आग धुमसत होती. खालिदने आपला वापर करुन आपल्या न जन्मलेल्या बाळाचा जीव घेतल्याची भावना तिच्या मनात घर करुन गेली. आपल्याला आयुष्यातून उठवणाऱ्या माणसाला जगातून नाहिसं करायचं, हा निर्धार तिने केला.

गेली आठ वर्ष खालिद सुरक्षा यंत्रणांच्या हातावर तुरी देऊन मृत्यूला चकवा देत होता. गेल्या काही वर्षात उत्तर ते दक्षिण काश्मिरात झालेल्या बहुतांश फिदायिनी हल्ल्यांचा तो मास्टरमाईंड होता. सोपोर, बारामुल्ला, हांडवारा, कुपवाडा अशा अनेक भागात त्याने हल्ले केले.

खालिदची प्रतिमा 'लव्हर बॉय'ची होती, असं म्हटलं जातं. इतकंच काय या घडीलाही त्याच्या तीन-चार गर्लफ्रेण्ड्स असल्याचं म्हटलं जातं.

तरुणीच्या माहितीनुसार पोलिसांनी त्याला यापूर्वीही गाठण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो निसटला. यावेळी तो एका महत्त्वाच्या व्यक्तीला भेटायला आला होता. सुरक्षा यंत्रणांवर त्याने गोळ्या झाडल्या, मात्र ही चकमक चार मिनिटांपेक्षा जास्त टिकली नाही.

खालिदच्या मृत्यूमुळे जम्मू काश्मिरातील दहशतवाद आटोक्यात आणण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV