दिल्लीतल्या ओदिशा भवनात श्रीखंड, पुरणपोळीची शाही मेजवानी!

राजधानी दिल्लीतल्या ओदिशा भवनाचा ताबा आज महाराष्ट्रीयन पद्धतीनं बनवलेल्या झुणक्यानं आणि पुरणपोळीनं घेतला होता.

दिल्लीतल्या ओदिशा भवनात श्रीखंड, पुरणपोळीची शाही मेजवानी!

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतल्या ओदिशा भवनात आज महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी अमराठी मंडळींची अक्षरश: झुंबड उडाली होती. कुणी पुरणपोळीबद्दल आजवर केवळ ऐकलं होतं पण त्याची चव चाखली नव्हती, तर कुणाला श्रीखंड हा किती लाजवाब प्रकार आहे याची पहिल्यांदाच जाणीव होत होती. खाद्यसंस्कृतीची ही आदान-प्रदान केंद्राच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ कार्यक्रमांतर्गत करण्यात आली होती.

odisha bhavan maharashtrian food 2-

चाणक्यपुरीमधल्या ओदिशा भवनाचा ताबा आज महाराष्ट्रीयन पद्धतीनं बनवलेल्या झुणक्यानं आणि पुरणपोळीनं घेतला होता. याशिवाय कोल्हापुरी चिकन, मसालेभात, सोलकढी, सावजी पनीर, भरली भेंडी अशा अनेक खाद्यपदार्थांची याठिकाणी रेलचेल होती.

‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ ही योजना केंद्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने ३१ ऑक्टोबर २०१७ या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जंयतीदिनापासून देशभर राबविण्यात येत आहे. देशातील राज्या-राज्यांमधील दुरावा कमी होऊन सांस्कृतिक आदान-प्रदानाच्या माध्यमातून संबंध  दृढ व्हावे हा या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे. त्याच अंतर्गत ओदिशा आणि महाराष्ट्राच्या दरम्यान ही खाद्यसंस्कृतीची देवाणघेवाण आयोजित करण्यात आली होती.

odisha bhavan maharashtrian food 3-

1 डिसेंबरला अशाच पद्धतीनं महाराष्ट्र सदनात ओदिशी पदार्थांची चव मराठीजनांना चाखता येणार आहे. यात मुख्यत्वे चेना तरकारी, धांटो मिक्स व्हेज, बडी चुरा, फेना कोंडा, चटणी या शाकाहारी पदार्थांसह  चोखली मांसो, मासो बेसर, मटन हे मांसाहारी पदार्थ उपलब्ध होणार आहेत याशिवाय, ओरिया राईस, रसगुल्लाही मसालेभात आणि श्रीखंडाची परतफेड करण्यासाठी महाराष्ट्र सदनात दाखल होणार आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Maharastrian food banquet at Odisha Bhawan in New Delhi latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV