मॅगझिन कव्हरवर मॉडेलचा स्तनपान करतानाचा फोटो

स्तनपान हे एका आईला मिळालेलं वरदान आहे. जर एखादी महिला आपल्या बाळाला दूध पाजत असेल तर त्यात लाज वाटण्याची गोष्ट नाही.

मॅगझिन कव्हरवर मॉडेलचा स्तनपान करतानाचा फोटो

कोची : स्तनपान हा मातृत्वाचा एक सुंदर आणि नैसर्गिक भाग आहे. नवजात बाळाच्या आरोग्यासाठी मातेने केलेलं स्तनपान अतिशय महत्त्वाचं असतं. परंतु तरीही सार्वजनिक ठिकाणी स्तनपान करणं हे अजूनही लोकांनी स्वीकारलेलं नाही. अशाच लोकांना एका मल्याळम मॅगझिनने बोल्ड कव्हर पेजद्वारे बोल्ड उत्तर दिलं आहे.

मल्याळम मॅगझिन 'गृहलक्ष्मी'च्या कव्हर पेजवर मॉडेल नवजात बाळाला स्तनपान करताना झळकली आहे. या फोटोमधील मॉडेलचं नाव गिलू जोसेफ आहे. गिलू जोसेफ एक कवयित्री, लेखिका आणि एअरहोस्टेस आहे. या मॅगझिनच्या कव्हर पेजवर लिहिलं आहे की, "स्तनपान करत असताना आम्हाला रोखून पाहू नका." स्तनपानादरम्यान रोखून पाहणाऱ्यांना दिलेल्या मेसेजमध्ये म्हटलं आहे की, "केरळमधील माता बोलत आहेत की, कृपया रोखून पाहू नका, आम्हाला स्तनपानाची आवश्यकता आहे."एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत, गिलू जोसेफ म्हणाली की, "या प्रोजेक्टसाठी जेव्हा मला विचारणा करण्यात आली तेव्हा मी हो म्हणण्यास क्षणाचाही विलंब केला नाही. स्तनपान हे एका आईला मिळालेलं वरदान आहे. जर एखादी महिला आपल्या बाळाला दूध पाजत असेल तर त्यात लाज वाटण्याची गोष्ट नाही. या गोष्टीकडे लैंगिकदृष्ट्या पाहणं चुकीचं आहे. हे चुकीचं/अयोग्य आहे, असा विचार तुम्ही का करता? जर तुम्ही तुमच्या बाळाला सार्वजनिक ठिकाणी दूध पाजत असाल तर कोणता देव तुमच्यावर नाराज होईल?"

या कॅम्पेनसाठी होकार देण्याआधी तुमच्या मनात कोणता किंतु परंतु होता का?, असं विचारलं असता गिलू जोसेफ म्हणाली की, "असं काही झालेलं नाही आणि मला माझ्या शरीराचा अभिमान आहे. योग्य वाटतील त्या गोष्टी मी करते."

"पण या प्रकरणात मला माझ्या कुटुंबाकडून कोणताही पाठिंबा मिळाला नाही. उलट हा प्रोजेक्ट स्वीकारल्याने त्यांनी मला जोरदार विरोध केला," असंही गिलू जोसेफ यांनी नमूद केलं.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Malyalam magazine Grihalakshmi cover has the image of a model feeding to newborn
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV