पाचपैकी चार राज्यात भाजपची सत्ता, मणिपूरमध्येही बहुमत सिद्ध

By: | Last Updated: > Monday, 20 March 2017 4:03 PM
manipur cm passed floor test

इंफाळ : गोव्यानंतर भाजपने मणिपूरमध्येही बहुमत सिद्ध केलं आहे. 60 सदस्यसंख्या असलेल्या मणिपूर विधानसभेत भाजपला 33 सदस्यांनी पाठिंबा दिला. भाजपचे यमनम खेमचंद यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

भाजपचे एन बिरेन सिंह यांनी 16 मार्च रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मणिपूरमध्ये पहिल्यांदाच भाजप सरकार स्थापन झालं आहे. एक अपक्ष आणि तृणमूल काँग्रेसच्या एका आमदारानेही भाजपला पाठिंबा दिला.

एनपीपीच्या चारही आमदारांना मंत्रिपद

मंत्रिमंडळात मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्यासह भाजपच्या दोन आमदारांना मंत्रिपद देण्यात आलं आहे. तर एनपीपी 4, एनपीएफ, एलजेपी प्रत्येकी एक आणि काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेल्या एका आमदाराला मंत्रिपद दिलं आहे.

भाजपने विधानसभा निवडणुकीत 21 जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेस 28 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र भाजपने अन्य पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन केली.

11 मार्च रोजी पाच राज्यांच्या निकाल लागल्यानंतर चार राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होईल, असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी सांगितलं होतं. गोवा आणि मणिपूरमध्ये संख्याबळ कमी असतानाही भाजपने अन्य पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन केली. तर उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपने बहुमताने सरकार स्थापन केलं.

मणिपूर विधानसभेतील पक्षीय बलाबल :

  • भाजप – 21
  • काँग्रेस – 28
  • नागा पीपल फ्रंट – 4
  • नॅशनल पीपल्स पार्टी – 4
  • तृणमूल काँग्रेस  -1
  • अपक्ष – 1
  • लोकजनशक्ती पार्टी – 1

गोव्यात भाजपची काँग्रेसवर मात

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी बहुमतासाठीची अग्निपरीक्षा पार पाडली. गोवा विधानसभेत भाजपने 16 विरुद्ध 22 मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, गोवा विधानसभेत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना बहुमत सिद्ध करायचं होतं.

40 जागांच्या गोवा विधानसभेत 13 जागा मिळवणाऱ्या भाजपच्या समर्थनार्थ 22 आमदारांनी मतदान केलं. तर 17 आमदारांनी सरकारविरोधात मत केलं. तर मतदानापूर्वी काँग्रेस आमदार विश्वजीत राणे यांनी सभात्याग केला. अशाप्रकारे पर्रिकर यांनी विधानसभेत बहुमतासाठी आवश्यक 21 आमदारांचा आकडा सहजरित्या पार केला.

विधानसभा निवडणुकीत 40 पैकी काँग्रेसला सर्वाधिक 17 भाजपला 13 महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला 3, गोवा फॉरवर्ड पार्टीला 3 जागा मिळाल्या होत्या. तर अपक्षांना 3 तर राष्ट्रवादीला एक जागा मिळाली होती. त्यातील मगोप, गोवा फॉरवर्ड पार्टी आणि अपक्षांनी भाजपला पाठिंबा दिल्यानं भाजपचं संख्याबळ 21 वर आलं.

उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये बहुमत

भाजपने देशातील सर्वात मोठं राज्य उत्तर प्रदेशमध्ये मित्रपक्षांसह 325 जागांवर विजय मिळवला. तर काँग्रेस-सपा 54, बसपा 19 आणि 5 अपक्षांनी विजय मिळवला. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी योगी आदित्यनाथ विराजमान झाले.

उत्तराखंडमध्येही भाजपने घवघवीत यश मिळवलं. 70 सदस्यसंख्या असलेल्या उत्तराखंड विधानसभेत भाजपने 57 जागांवर विजय मिळवत काँग्रेसकडून सत्ता खेचून आणली. काँग्रेसला केवळ 11 जागांवर समाधान मानावं लागलं. भाजपचे त्रिवेंद्र सिंह रावत उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत.

पंजाबमध्ये काँग्रेसला घवघवीत यश

मणिपूर आणि गोव्यात सर्वात मोठा पक्ष ठरलेला असतानाही काँग्रेसला सत्ता स्थापन करता आली नसली तरी पंजाबमध्ये मात्र काँग्रेसने बहुमताने सरकार स्थापन केलं आहे. पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी शपथ घेतली.

WEB-RESULTS-FNL

संबंधित बातम्या :

योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान

त्रिवेंद्र सिंह रावत उत्तराखंडचे मुख्यमंत्री

भाजपने उत्तर प्रदेश, उत्तराखंड कमावलं, गोवा मात्र गमावलं

मनोहर पर्रिकर गोव्याचे 13वे मुख्यमंत्री, कोंकणीतून शपथ

Assembly Election Result 2017 : पाच राज्यांचे अंतिम निकाल

देशातील 12 राज्य भाजपमय, काँग्रेसचं अस्तित्व नगण्य

UP Assembly Election Result 2017: उत्तर प्रदेशचा निकाल

Punjab Assembly Election Result 2017: पंजाबचा निकाल

GOA Assembly Election Result 2017: गोवा निवडणूक निकाल

Uttarakhand Assembly Election Result 2017 : उत्तराखंडचा निकाल

Manipur Assembly Election Result 2017: मणिपूर विधानसभा अंतिम निकाल

First Published:

Related Stories

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 28/06/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 28/06/2017

युरोपमध्ये पुन्हा सायबर हल्ला, बँका, कंपन्यांसह ब्रिटीश

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानींचा पगार किती?
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानींचा पगार किती?

मुंबई : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा पगार

महिलांनी रेपच्या बदल्यात जवानांची गुप्तांगं कापली, आझम बरळले
महिलांनी रेपच्या बदल्यात जवानांची गुप्तांगं कापली, आझम बरळले

लखनऊ: वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या समाजवादी पक्षाचे

पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी उरले फक्त दोन दिवस!
पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी उरले फक्त दोन दिवस!

नवी दिल्ली : इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांवर आता पॅन कार्ड नंबर आधार

राष्ट्रपती निवडणुकीसाठी यूपीएकडून मीरा कुमार यांचा अर्ज दाखल
राष्ट्रपती निवडणुकीसाठी यूपीएकडून मीरा कुमार यांचा अर्ज दाखल

नवी दिल्ली: राष्ट्रपतीपदासाठीच्या यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार

लेह-लडाखपर्यंत रेल्वेचं जाळं, सर्वात उंचावरील रेल्वेमार्ग ठरणार
लेह-लडाखपर्यंत रेल्वेचं जाळं, सर्वात उंचावरील रेल्वेमार्ग ठरणार

लेह : चीनपासून वाढता धोका पाहता मोदी सरकारने रेल्वेचं जाळं आता

युरोपमध्ये पुन्हा सायबर हल्ला, भारतालाही धोका
युरोपमध्ये पुन्हा सायबर हल्ला, भारतालाही धोका

मुंबई : वॉनाक्रायच्या दहशतीच्या महिन्याभरानंतर नव्या पीटरॅप

पासपोर्टचे रंग बदलले म्हणून रक्ताची नाती मिटत नाहीत : मोदी
पासपोर्टचे रंग बदलले म्हणून रक्ताची नाती मिटत नाहीत : मोदी

हेग : पासपोर्टचे रंग बदलले म्हणून रक्ताची नाती मिटत नाहीत, असे म्हणत

जीएसटीनंतर वीज दर वाढणार नाहीत : पियुष गोयल
जीएसटीनंतर वीज दर वाढणार नाहीत : पियुष गोयल

नवी दिल्ली : जीएसटीनंतर वीज बिल वाढण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.

भारताकडे ग्लोबल इकॉनॉमिक पॉवर, नेदरलँडच्या पंतप्रधानांकडून मोदींचं स्वागत
भारताकडे ग्लोबल इकॉनॉमिक पॉवर, नेदरलँडच्या पंतप्रधानांकडून...

अॅमस्टरडॅम : अमेरिका दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट