पुढच्या वर्षी नोकरदारांना चांगली पगारवाढ, मॅनपॉवर ग्रुपचा दावा

2018 मध्ये नोकरदारांना 10 ते 15 टक्के पगारवाढ मिळू शकते, असा दावा मॅनपॉवर ग्रुपच्या आर्थिक वर्षासंदर्भातील अहवालातून करण्यात आला आहे.

पुढच्या वर्षी नोकरदारांना चांगली पगारवाढ, मॅनपॉवर ग्रुपचा दावा

नवी दिल्ली : 2017 हे वर्ष नोकरदार वर्गासाठी चढ-उताराचं ठरलं. पण आगामी 2018 हे वर्ष नोकरादारांसाठी चांगले असल्याचे संकेत मिळत आहेत. कारण, 2018 मध्ये नोकरदारांना 10 ते 15 टक्के पगारवाढ मिळू शकते, असा दावा मॅनपॉवर ग्रुपच्या आर्थिक वर्षासंदर्भातील अहवालातून करण्यात आला आहे.

मॅनपॉवर ग्रुप ही कंपनी विविध कंपन्यांना रोजगाराच्या प्रश्नावर सल्ला देते. या कंपनीने आपला अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. यात 2018 मध्ये रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील, असंही म्हटलं आहे.

चालू वर्षात नोटाबंदीमुळे कापड उद्योगाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. पण या वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत मंदीनंतर रोजगाराच्या संधीमध्ये समाधानकारक वाढ झाली आहे.

कंपनीच्या अहवालात म्हटलंय की, जानेवारी ते मार्च या तिमाहीत रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होण्यामध्ये 22 टक्क्यांची घट झाली. त्यानंतर एप्रिल ते जून दरम्यान देखील ही घसरण 19 टक्के होती. यानंतर जुलै ते सप्टेंबर दरम्यान रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यात 16 टक्क्यांची घट झाल्याचं पाहायला मिळालं. पण ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यानच्या तिमाहीत रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्यात तब्बल 24 टक्क्यांची वाढ झाल्याची नोंद करण्यात आली.

त्यामुळे 2018 मध्ये रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्याच्या प्रमाणात सुधारणा होईल, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. यामध्ये मोबाईल उत्पादक आणि सेवा पुरवणाऱ्या कंपनी, फायनान्स क्षेत्र आणि स्टार्ट-अपसह अनेक क्षेत्रातील रोजगाराच्या संधींमध्ये वाढ होईल.

याशिवाय, पगारवाढीमध्ये देखील ही वाढ अपेक्षित असल्याचा अंदाज अहवालातून व्यक्त करण्यात आला आहे. 2017 मध्ये पगारवाढीचं प्रमाण 8 ते 10 टक्के होतं. पण 2018 मध्ये ते 10 ते 15 टक्के राहिल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: the expected increase in salary increments next-year-report
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV