अल्पवयीन मुलीचा विवाहांतर्गत बलात्कार गुन्हा नाही : सुप्रीम कोर्ट

मॅरिटल रेप किंवा विवाहाअंतर्गत बळजबरीने केलेला इंटरकोर्स (लैंगिक संबंध) हा वादाचा मुद्दा ठरत होता, मात्र तो कायद्याने बलात्कार ठरणार नाही, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं.

अल्पवयीन मुलीचा विवाहांतर्गत बलात्कार गुन्हा नाही : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : 15 वर्षांवरील अल्पवयीन मुलीवर तिच्या पतीने बलात्कार केला, तरी तो गुन्हा ठरणार नसल्याचं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. भारत दंड विधायक 375 मधील अपवादाचा उल्लेख करत सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला.

लग्नसंस्थेच्या बचावासाठी हा अपवाद आवश्यक असल्याचं मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केलं आहे. 15 वर्षांवरील अल्पवयीन मुली (वय वर्ष 15 ते 18) सोबत तिच्या पतीने शारीरिक संबंध ठेवले, तरी तो गुन्हा ठरणार नाही. मॅरिटल रेप किंवा विवाहाअंतर्गत बळजबरीने केलेला इंटरकोर्स (लैंगिक संबंध) हा वादाचा मुद्दा ठरत होता, मात्र तो कायद्याने बलात्कार ठरणार नाही, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं.

15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलीने तिच्या पतीसोबत संमतीने शारीरिक संबंध ठेवले, तरी पतीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला जात असे. अशा प्रकरणांमध्ये कोर्टाला न्याय देताना त्रासाला सामोरं जावं लागत असे. त्यामुळे गेल्या तीन वर्षात बालविवाहाअंतर्गत आलेल्या खटल्यांची तीन आठवड्यात माहिती देण्यास सांगितलं.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV