भारतीय वायुदलाचे मार्शल अर्जन सिंह यांचं निधन

अर्जन सिंह हे पाच स्टार मिळवणारे भारतीय वायुदलाचे एकमेव अधिकारी होते. 1965 मध्ये त्यांनी वयाच्या 45 व्या वर्षी सर्वात तरुण वायुसेना प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली होती.

भारतीय वायुदलाचे मार्शल अर्जन सिंह यांचं निधन

नवी दिल्ली : 1965 साली भारत-पाकिस्तान युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणारे भारतीय वायुदलाचे मार्शल अर्जन सिंह यांचं निधन झालं. वयाच्या 98 व्या वर्षी अर्जन सिंह यांनी अखेरचा श्वास घेतला.

हृदयविकाराचा धक्का बसल्यानंतर शनिवारी सकाळी त्यांना लष्कराच्या आर अँड आर रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. लष्करी रुग्णालयातच संध्याकाळी 7 वाजून 47 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी अर्जन सिंह यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

https://twitter.com/Gen_VKSingh/status/909068920140599297

कोण होते अर्जन सिंह?

अर्जन सिंह हे पाच स्टार मिळवणारे भारतीय वायुदलाचे एकमेव अधिकारी होते. 1965 मध्ये त्यांनी वयाच्या 44 व्या वर्षी सर्वात तरुण वायुसेना प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली होती.

अर्जन सिंह यांचा जन्म 15 एप्रिल 1919 रोजी सध्या पाकिस्तानात असलेल्या पंजाब प्रांतातील लिआलपूरमध्ये झाला. कॉलेजमध्ये शिकताना वयाच्या 19 व्या वर्षीच त्यांची निवड एम्पायर वैमानिक प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी झाली.


15 ऑगस्ट 1947 रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावरुन उडणाऱ्या भारतीय वायूदलाच्या शेकडो विमानांच्या अग्रभागी असलेल्या एअरक्राफ्टचं सारथ्य करण्याचा बहुमान त्यांना मिळाला.

1 ऑगस्ट 1964 ते 15 जुलै 1969 या कालावधीत ते एअर स्टाफचे प्रमुख होते. 1965 मध्ये अर्जन सिंह यांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आलं होतं. 1970 मध्ये वयाच्या 50 व्या वर्षी त्यांनी निवृत्ती घेतली.

1971 मध्ये अर्जन यांची स्वित्झर्लंडमध्ये भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याचवेळी त्यांनी व्हॅटिकनचे राजदूत म्हणूनही काम पाहिलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विटरवरुन श्रद्धांजली अर्पण केली आहे.

https://twitter.com/narendramodi/status/909083404456517632

https://twitter.com/narendramodi/status/909083228606042112

https://twitter.com/narendramodi/status/909082959713415168

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही ट्विटरवर फोटो शेअर करत श्रद्धांजली अर्पण केली आहे.

https://twitter.com/rashtrapatibhvn/status/909084630120251392

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV