उत्तराखंडमध्ये दरड कोसळली, औरंगाबादच्या 102 भाविकांसह 15 हजार जण अडकले

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Saturday, 20 May 2017 10:26 AM
उत्तराखंडमध्ये दरड कोसळली, औरंगाबादच्या 102 भाविकांसह 15 हजार जण अडकले

badrinath landslide

देहरादून: उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्यामुळे जवळपास 15 हजार भाविक अडकले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील औरंगाबादच्या 102 भाविकांचाही समावेश आहे.

औरंगाबादमधील 102 भाविक रूद्रप्रयागमध्ये अडकले असल्याची माहिती मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.  सर्व भाविक सुखरूप असून राज्य सरकराच्या संपर्कात असल्याचंही त्यांनी ‘एबीपी माझा’ला सांगितलं.

“आम्ही उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील भाविकांच्या संपर्कात आहोत.

औरंगाबादचे सर्व 102 भाविक सुखरुप आहेत.

स्थानिक प्रशासनाच्या मदतीने सर्वांना हॉटेलपर्यंत पोहोचवलं आहे.

लवकरच ते महाराष्ट्रात परततील”,

असं चंद्रकांतदादा म्हणाले.

 

दोन दिवस रस्ता बंद?

दरड कोसळल्यामुळे बद्रीनाथचा रस्ता बंद झाला असून तो पुन्हा सुरु करण्यासाठी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे.

विष्णूप्रयाग परिसरातील हाथी पर्वत भागात भूस्खलन होऊन 15 हजार भाविक अडकले आहेत. चामोली जिल्ह्यातील जोशीमठ भागापासून 9  किलोमीटर अंतरावर भूस्खलन झालं.

भूस्खलनानंतर रस्त्यावर पडलेल्या ढिगाऱ्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. रस्त्यावरील मातीचे ढिगारे हटवून वाहतूक लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे बद्रिनाथकडे जाणारी वाहतूक पूर्ववत होण्यास वेळ लागणार आहे.

चार धाम यात्रेला सुरुवात झाल्याने उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाली आहे.

लातूर जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

दरम्यान, लातूरमधील भाविक उत्तराखंड परिसरात अडकले असल्यास त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

लातूर जिल्ह्यातून काही भाविक उत्तराखंड येथे या परिसरात असल्यास संबंधित नातेवाईकांनी तत्काळ लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षास माहिती द्यावी. 02382 220204/टोल फ्री 1077 ,  या नंबरवर संपर्क साधावा, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. 

उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

बद्रीनाथ येथे झालेल्या “लँड स्लाइड” मुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत उस्मानाबाद जिल्ह्यातीलही काही नागरीक अडकले आहेत. तरी  माहितीकरिता त्यांच्या नातेवाईकांनी 02472-225618 / 227301 या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.

डोंगरकडा कोसळला 

शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास जोशीमठापासून 9 किमी अंतरावर, विष्णूप्रयागजवळ डोंगरकडा कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठा कडा थेट रस्त्यावर कोसळल्यामुळे हा रस्ताच बंद झाला.

जवळपास 150 मीटर भाग पूर्णपणे उद्ध्व्स्त झाला. गेल्या दोन दिवसांपासून हा डोंगरकडा धोकादायक स्थितीत होता.

दरम्यान, भाविकांना दुर्घटनास्थळापासून 200 मीटर मागे रोखण्यात आलं आहे.

प्रवासी अडचणीत

भूस्खलनामुळे देशभरातील जवळपास 15 हजार भाविक बद्रीनाथ धाम रस्त्यावर अडकले आहेत. उत्तराखंड सरकारने या भाविकांच्या राहण्याची व्यवस्था करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. तसंच भाविकांना आहे तिथेच थांबण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. याशिवाय रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्याही आहे त्याच परिस्थितीत रोखण्यास सांगितलं आहे.

काही भाविक तर बद्रीनाथकडे पोहोचलेही नाहीत, ते परतण्याच्या तयारीत आहेत.

यापूर्वीही भूस्खलन

यापूर्वी 2015 मध्येही भूस्खलन झालं होतं. त्यावेळी हा रस्ता जवळपास आठवडाभर बंद होता. त्यावेळी सरकारने भाविकांना बाहेर काढण्यासाठी सबसिडी तत्त्वावर हेलिकॉप्टर यात्रा सुरु केली होती. आता मात्र हा रस्ता 2 दिवसात सुरळीत होईल, असा दावा करण्यात येत आहे.

First Published: Saturday, 20 May 2017 7:56 AM

Related Stories

उत्तराखंडमध्ये भाविकांची बस नदीत कोसळली, 22 जणांचा मृत्यू
उत्तराखंडमध्ये भाविकांची बस नदीत कोसळली, 22 जणांचा मृत्यू

देहरादून: उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये भाविकांना घेऊन जाणारी बस

स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु चंद्रास्वामी यांचं निधन
स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु चंद्रास्वामी यांचं निधन

नवी दिल्ली : स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु चंद्रास्वामी यांचं निधन

तिहेरी तलाक प्रथेवर जावेद अख्तर यांची सडेतोड भूमिका
तिहेरी तलाक प्रथेवर जावेद अख्तर यांची सडेतोड भूमिका

मुंबई : सुप्रसिद्ध गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी तिहेरी

जीपवर काश्मिरी तरुणाला बांधणाऱ्या मेजर गोगोईंचा सत्कार
जीपवर काश्मिरी तरुणाला बांधणाऱ्या मेजर गोगोईंचा सत्कार

नवी दिल्ली : दगडफेक करणाऱ्यांपासून बचावासाठी जीपच्या बोनेटवर

LIVE UPDATE : सर्जिकल स्ट्राईकनंतर भारताची मोठी कारवाई
LIVE UPDATE : सर्जिकल स्ट्राईकनंतर भारताची मोठी कारवाई

घुसखोरीविरोधात भारतीय सैन्याने पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई

शिवसेना आक्रमक, कर्नाटकच्या बसवर 'जय महाराष्ट्र'चे स्टिकर्स
शिवसेना आक्रमक, कर्नाटकच्या बसवर 'जय महाराष्ट्र'चे स्टिकर्स

कोल्हापूर : कर्नाटक सरकार आणि कानडी भाषेविरोधात बोलणाऱ्या

आयुर्वेदिक उत्पादनांवर GST लावल्याने रामदेव बाबा नाराज
आयुर्वेदिक उत्पादनांवर GST लावल्याने रामदेव बाबा नाराज

नवी दिल्ली : आयुर्वेदिक उत्पादनावर 12 टक्के जीएसटी लावल्याने रामदेव

पाकचा रडीचा डाव, नौशेरातील चौक्या उद्ध्वस्त केल्याच्या दाव्याचा इन्कार
पाकचा रडीचा डाव, नौशेरातील चौक्या उद्ध्वस्त केल्याच्या दाव्याचा...

नवी दिल्ली : पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या कुरापतींना भारताने

हवाई दलाचं सुखोई-30 विमान बेपत्ता
हवाई दलाचं सुखोई-30 विमान बेपत्ता

दिसपूर : नियमित सरावासाठी गेलेलं हवाई दलाचं सुखोई-30 हे विमान बेपत्ता

घुसखोरीविरोधात भारताचा करारा जवाब, पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त
घुसखोरीविरोधात भारताचा करारा जवाब, पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त

नवी दिल्ली : घुसखोरीविरोधात भारतीय सैन्याने पाकिस्तानविरोधात मोठी