भीमा-कोरेगाव हिंसाचारामागे भाजप आणि संघाचा हात : मायावती

'या घटनेमागे भाजप, आरएसएस आणि काही जातीयवादी संघटनांचा हात आहे.'

भीमा-कोरेगाव हिंसाचारामागे भाजप आणि संघाचा हात : मायावती

लखनौ : भीमा-कोरेगावमध्ये झालेल्या घटनेनंतर आज (बुधवार, 3 जानेवारी) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. याच संपूर्ण घटनेविषयी उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला.

भीमा-कोरेगावमधील घटनेला भाजप आणि आरएसएस जबाबदार असल्याचा आरोप मायावतींनी केला आहे. 'या घटनेमागे भाजप आणि आरएसएसचा हात आहे. कारण तिथं सुरक्षेच्या दृष्टीने पुरेशी उपाययोजनाच करण्यात आल्या नव्हत्या. ही घटना रोखता आली असती. सरकारनं तिथं चोख सुरक्षा व्यवस्था ठेवायला हवी होती.' असं मायावती यावेळी म्हणाल्या.

दरम्यान, यावेळी त्यांनी भाजपवरही जोरदार निशाणा साधला. 'या घटने मागे भाजप, आरएसएस आणि काही जातीयवादी संघटनांचा हात आहे.' असंही त्या यावेळी म्हणाल्या.मायावती यांच्याआधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनही आरएसएस आणि भाजपवर निशाणा साधला होता. 'दलित समाज कायम तळागाळातच राहावा हाच भाजप, संघाच्या कट्टरवादी विचारांचा पाया आहे. आधी उना, मग रोहित वेमुला आणि आता भीमा-कोरेगाव ही त्याची प्रतिकं आहेत.' असं ट्वीट करुन त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं होतं.

VIDEO : 

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: mayawati attacks bjp and rss on bhima koregaon violence latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV